Hera Pheri 3 | चाहत्यांना मोठा धक्का, हा अभिनेता हेरा फेरी 3 मध्ये मुख्य भूमिकेत, कार्तिक आर्यन याचा पत्ता कट
हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार हा दिसणार नसल्याचे कळताच चाहत्यांमध्ये नाराजी बघायला मिळत होती. चित्रपट निर्माते कार्तिक आर्यन याच्यासोबतच अक्षय कुमार याच्याशी देखील चर्चा करत होते.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 या चित्रपटामुळे चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार (Akshay Kumar) याने म्हटले होते की, हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने मी या चित्रपटाला नकार दिला आहे. यावर फिरोज नाडियाडवाला यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिल्याने चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटासाठी कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याला आॅफर दिल्याचे रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले होते. मात्र, हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार हा दिसणार नसल्याचे कळताच चाहत्यांमध्ये नाराजी बघायला मिळत होती. चित्रपट निर्माते कार्तिक आर्यन याच्यासोबतच अक्षय कुमार याच्याशी देखील चर्चा करत होते.
हेरा फेरी 3 या चित्रपटामध्ये अक्षय कुमार यालाच बघण्यासाठी चाहते इच्छुक होते. परंतू सतत कार्तिक आर्यन याचे नाव चर्चेत होते. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या जोडीने हेरा फेरी चित्रपटामध्ये यापूर्वी धमाल केलीये. मात्र, हेरा फेरी 3 मध्ये अक्षय दिसणार नसल्याचे नाराजी सतत वाढत होती.
शेवटी आता अक्षय कुमार याच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलीये. हेरा फेरी 3 या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची तिघडी परत एकदा बघायला मिळणार आहे. रिपोर्टनुसार अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 हा चित्रपट साईन केला असून चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात झालीये.
The trio is back?#HeraPheri3 pic.twitter.com/gJcH1jpTYI
— Sachin? (@sachin__rtt) February 22, 2023
हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिल्याचे अजून अक्षय कुमार याच्याकडून सांगण्यात आले नाहीये. परंतू शूटिंग सुरू झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. अक्षय कुमार याचे चाहते त्याला हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये पाहण्यास इच्छुक असल्याने खिलाडी कुमार याने आपला निर्णय बदलल्याचे सांगितल जात आहे.
नुकताच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाण्याची शक्यता आहे. ओपनिंग डेला हा चित्रपट धमाका करण्यात अपयशी ठरला आहे. ओपनिंग डेला चित्रपटाने 3 कोटींची कमाई बाॅक्स आॅफिसवर केलीये.
अक्षय कुमार याच्या सेल्फी चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कारण 2023 मध्ये अक्षय कुमार याचा रिलीज होणारा सेल्फी हा पहिला चित्रपट आहे. 2022 मध्ये रिलीज झालेले अक्षय कुमार याचे जवळपास सर्वच चित्रपट फ्लाॅप गेले. अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील एकमेंव असा अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षात तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात.