Mannat | शाहरुख खानच्या आलिशान ‘मन्नत’च्या नावामागे ही एक अनोखी कथा, तुम्हाला माहितीये का?

रोमान्सचा बादशाह असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आज (2 नोव्हेंबर) 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत झाला होता. शाहरुख खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Mannat | शाहरुख खानच्या आलिशान ‘मन्नत’च्या नावामागे ही एक अनोखी कथा, तुम्हाला माहितीये का?
Shah Rukh Khan
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 11:47 AM

मुंबई : रोमान्सचा बादशाह असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आज (2 नोव्हेंबर) 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत झाला होता. शाहरुख खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाआधीच त्याचा आलिशान ‘मन्नत’ (Mannat) बंगला रोषणाईने सजवण्यात आला आहे.

शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते त्याच्या घराबाहेर जमा होतात. शाहरुखही दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला आपल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी ‘मन्नत’च्या सर्वात उंच कोपऱ्यावर उभा राहतो. आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या आलिशान ‘मन्नत’बद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.

‘मन्नत’चं नाव काही औरच होतं!

शाहरुख खानने एका गुजराती व्यावसायिकाकडून आपले स्वप्नातील घर विकत घेतले आहे. या घराचे नाव पूर्वी व्हिला व्हिएन्ना होते. पण जेव्हा त्याने हे घर विकत घेतलं, तेव्हा त्यला ‘जन्नत’ हे नाव ठेवावं असं वाटलं. पण हे घर घेतल्यानंतर त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागली आणि तो करिअरच्या शिखरावर पोहोचला. त्यामुळे त्यांनी आपल्या घराचे नाव ‘जन्नत’ ऐवजी ‘मन्नत’ ठेवले.

कधीही घर विकणार नाही!

शाहरुख खानने नुकतेच सांगितले होते की, जर मी एखाद्या दिवशी संकटात सापडलो तर मी स्वतःला विकेन, पण ‘मन्नत’ कधीच विकणार नाही. शाहरुख खानचे ड्रीम हाऊस जगातील टॉप 10 घरांपैकी एक आहे.

शाहरुखने ‘मन्नत’ हे घर खरेदी केले तेव्हा त्याची किंमत 13.32 कोटी होती. मात्र, आता त्याच्या सहा मजली घराची किंमत 200 कोटींवर गेली आहे. ‘मन्नत’ हे वांद्रे बँडस्टँड, मुंबई येथे समुद्राभिमुख आहे. ‘मन्नत’ची रचना शाहरुख खानची पत्नी गौरीने केली आहे.

पुन्हा सजला ‘मन्नत’

शाहरुख खान सध्या खूप कठीण काळातून जात आहे. त्यांचा मुलगा आर्यन नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. शाहरुखचे घर प्रत्येक वेळीप्रमाणे यावेळेसही सजले आहे. शाहरुखच्या वाढदिवसापूर्वीच त्याच्या घरी भेटवस्तू आणि फुलांची आवक सुरू झाली आहे. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शाहरुख खानने इंडस्ट्रीत जे स्थान मिळवले आहे, काही लोक त्याची केवळ कल्पनाच करू शकतात. आज जरी शाहरुख चित्रपटांपासून ब्रेकवर असला, तरी एक काळ असा होता जेव्हा शाहरुखचा पडद्यावर मोठा दबदबा होता. हे स्टारडम आजही कमी झालेले नाही. शाहरुख हा बॉलिवूडचा असाच एक अभिनेता आहे ज्याने पडद्यावर नकारात्मक भूमिका करूनही लोकांना दाखवून दिले होते की, खलनायक गाणे गाऊ शकतो आणि जीव देखील घेऊ शकतो.

हेही वाचा :

लग्न सलमानचं, काळजी महेश मांजरेकरांना! म्हणतायत ‘तो आतून एकटा पडलाय, त्याला…’

Zee Marathi Awards 2021 : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.