Making Of Vighnaharta : असं झालं चित्रीकरण; ‘अंतिम’च्या ‘विघ्नहर्ता’गाण्याचा ‘मेकिंग व्हिडीओ’ प्रदर्शित!
गाण्याचा हा ट्रॅक प्रचंड सुंदर आहे. मेकिंगमध्ये गणपती उत्सवाची भव्यता दाखवण्यात आली आहे, व्हिडीओमध्ये चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या सलमान खानची धुंआधार एंट्री दाखवण्यात आली आहे. (This is how the filming happened; 'Making Video' of 'Vighnaharta' song)
मुंबई : ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या निर्मात्यांनी ‘विघ्नहर्ता’ या गाण्याचा मेकिंग (Making Of Vighnaharta) व्हिडीओचा प्रदर्शित केला आहे. हा व्हिडीओ सद्याच्या टॉप-रेटेड ट्रॅकमधील एक आहे. मेकिंग व्हिडीओमध्ये एक आकर्षक आणि शानदार सेट-अप दाखवण्यात आला आहे, जो गणपती आणि त्या उत्सवी वातावरणासाठी अगदी परफेक्ट आहे.
गाण्याचा हा ट्रॅक प्रचंड सुंदर आहे. मेकिंगमध्ये गणपती उत्सवाची भव्यता दाखवण्यात आली आहे, व्हिडीओमध्ये चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या सलमान खानची धुंआधार एंट्री दाखवण्यात आली आहे. मेकिंगमध्ये लक्षात येण्यासारखी गोष्ट ही आहे की कोणीही कलाकार आणि क्रु सदस्यांची गणपतीविषयी असलेली भावना आणि भक्ती सहज अनुभवू शकतो, जेव्हा ते याचं चित्रीकरण करत होते. मेकिंगवरून कळते आहे की वरुण धवन आणि आयुषनं या ट्रॅकमध्ये किती मेहनत घेतली आहे. वरुणनं नेहमीप्रमाणेच या गाण्यात आपल्यातील ऊर्जेने जीव ओतला आहे आणि आयुष प्रत्येक डान्स स्टेप आणि स्टन्ट्स त्याच्यासोबत तितक्याच ऊर्जेने सहभागी झाला असून कोरियोग्राफीचे तंतोतंत पालन करत आहे. निश्चितपणे, दोघांनीही याला चमकदार आणि जबरदस्त बनवलं आहे.
पाहा व्हिडीओ
हे गाणं उल्हासपूर्ण आणि थिरकायला लावणारं आहे आणि या गाण्याला तितकाच जबरदस्त सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येनं या गाण्याला रँकिंग मिळाली आहे. व्हिडीओ पाहताना, ही मेकिंग कलाकारांसाठी आणि संपूर्ण क्रूसाठी देखील तेवढीच मनोरंजक राहिली आहे. गाणं आणि त्याची मेकिंग यामध्ये, क्रू सदस्य आणि कलाकारांनी यातील गतीला जीवंत केलं आहे आणि शेवटपर्यंत अबाधित ठेवलं आहे. गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान, आयुष जखमी झाला होता, ज्यामुळे अत्यधिक ऊर्जावान डान्स स्टेप्स त्याच्यासाठी आव्हानात्मक बनल्या होत्या, तरीही त्यानं कौतुकास्पद काम केलं आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला बाधा न पोहोचवता महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा सार आणि उत्सवीपण चपखलपणे यात दाखवण्यात आलं आहे. सटीक आणि स्पष्ट पद्धतीनं हा ट्रॅक चित्रित केला आहे. या डान्स ट्रॅकला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो आहे, तो पाहता कलाकार आणि क्रू सदस्यांची कठोर मेहनत फळाला आली असून चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढवली आहे.
‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ सलमान खान फिल्म्सद्वारे प्रस्तुत आणि सलमान खान यांच्याद्वारे निर्मित आहे. महेश मांजरेकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
संबंधित बातम्या
Yami Gautam : साधा सरळ…पण स्टनिंग लूक; यामी गौतमच्या ‘या’ ड्रेसची किंमत माहीत आहे का?
Monalisa : लाल सूटमध्ये दिसला मोनालिसाचा सिझलिंग अवतार, पाहा फोटो