Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Alia: नीतू कपूर यांनी सांगितला रणबीरच्या वरातीचा धमाल किस्सा; दक्षिण आफ्रिकेतील लग्न रद्द करण्यामागचं कारणही आलं समोर

जवळपास महिनाभरानंतर त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नातील बऱ्याच गोष्टी, धमाल किस्से उलगडून सांगितले आहेत. रणबीर आणि आलियाला (Ranbir Alia) दक्षिण आफ्रिकेत डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

Ranbir Alia: नीतू कपूर यांनी सांगितला रणबीरच्या वरातीचा धमाल किस्सा; दक्षिण आफ्रिकेतील लग्न रद्द करण्यामागचं कारणही आलं समोर
Ranbir Alia WeddingImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 9:59 AM

गेल्या महिन्यात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नबंधनात अडकले. या लग्नाविषयीची प्रत्येक माहिती दोघांच्या कुटुंबीयांना गुलदस्त्यात ठेवली होती. लग्नाच्या एक दिवस आधी रणबीरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी उद्या लग्न होणार असल्याचं फोटोग्राफर्सना सांगितलं. आता जवळपास महिनाभरानंतर त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नातील बऱ्याच गोष्टी, धमाल किस्से उलगडून सांगितले आहेत. रणबीर आणि आलियाला दक्षिण आफ्रिकेत डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं, असंही त्यांनी सांगितलं. रणबीर-आलियाच्या लग्नाला 40 पाहुणे आणि त्यानंतर रिसेप्शनला 40 पाहुणे उपस्थित होते. लग्नात नीतू यांनी रिधिमा कपूर, समारा कपूर, करिश्मा आणि करीना कपूर, रिमा जैन आणि इतरांसोबत मिळून सरप्राइज डान्स परफॉर्मन्स केला होता. एका दिवसात त्यांनी या परफॉर्मन्सची तयारी केल्याचं नीतू यांनी सांगितलं. ‘मेहंदी है रचनेवाली’, ‘ढोलिडा’, ‘क्युटी पाई’ या गाण्यांवर त्यांनी डान्स केला होता.

फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “ते म्हणाले आम्हाला सर्कस नकोय, आम्हाला कोणालाच काही सांगायचं नाहीये. आधीच सोशल मीडियावर व्हायरल झालेले मीम्स आणि इतर पोस्ट पाहून आम्ही लग्नाविषयी चिंतेत होतो. त्यामुळे कोणालाच काही न सांगता लग्न समारंभ पार पाडण्याचा निर्णय घेतला. आम्ही लग्नाची शॉपिंगसुद्धा करू शकलो नव्हतो. जे काही सामान लागणार होतं, ते आणण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी ठराविक माणसं नेमली होती. कारण आम्ही बाहेर कुठेच जाऊ शकत नव्हतो. जर आम्ही बाहेर पडलो असतो, तर लोकांना लग्नाविषयी लगेच समजलं असतं. पण अखेर जेव्हा इमारतीला रोषणाई लावण्यात आली आणि सब्यसाची यांच्याकडून डिझायनर कपडे आले, तेव्हा सर्वांना समजलं.”

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

“सर्वकाही खूपच सुंदर होतं. लग्नातील सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे वरात. पाचव्या मजल्यावरून सातव्या मजल्यावर ही वरात गेली होती. मजल्यावरील पॅसेजमध्ये आम्ही भांगडा करत होतो. मला घोड्यावरून रणबीरची वरात काढायची होती. पण असं केलं असतं तर पुन्हा पापाराझींचं लक्ष वेधलं असतं, म्हणून तो प्लॅन रद्द केला. रणबीर आणि आलियाने लग्नासाठी खूप काही प्लॅन केलं होतं. त्यांना दक्षिण आफ्रिकेत लग्न करायचं होतं. मात्र अखेर घरातच त्यांनी लग्नगाठ बांधली. दोन वर्षांपासून आम्ही विवाहस्थळाविषयी विचार करत होतो. पण जे झालं ते खूपच सुंदर होतं”, असं त्यांनी सांगितलं. रणबीर-आलियाने मुंबईतल्या ‘वास्तू’ या निवासस्थानी 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. रणबीरच्या या बंगल्याच्या बाल्कनीतच त्यांचं लग्न पार पडलं. यावेळी फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.