Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली; कारण आलं समोर

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चांनंतर आता लग्नाची तारीख पुढे ढकलल्याचं कळतंय. 14 एप्रिल रोजी हे दोघं लग्नगाठ बांधणार होते.

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली; कारण आलं समोर
Ranbir Kapoor and Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 1:02 PM

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चांनंतर आता लग्नाची तारीख पुढे ढकलल्याचं कळतंय. 14 एप्रिल रोजी हे दोघं लग्नगाठ बांधणार होते. आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी याबद्दलची माहिती माध्यमांना दिली होती. मात्र आता लग्नाची ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट्ट (Rahul Bhatt) याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दलची माहिती दिली. 13 आणि 14 एप्रिल रोजी लग्नाचे कोणतेच विधी पार पडणार नसल्याचं त्याने सांगितलंय. लग्नाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आर. के. बंगल्याला रोषणाईदेखील करण्यात आली आहे. एवढी तयारी झाली असताना आता लग्न का पुढे ढकललंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

‘आज तर डॉट इन’ला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला, “लग्न होणार आहे आणि हे सर्वाना माहित झालंय. पण 13 आणि 14 एप्रिल रोजी लग्न होणार नाही, हे नक्की. खरंतर आधी याच तारखा ठरवण्यात आल्या होत्या. मात्र मीडियाला ती माहिती लीक झाल्याने आता तारखा बदलण्यात आल्या आहेत. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांवर बराच प्रेशर येत असल्याने तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लवकरच त्याबद्दलची माहिती माध्यमांना देण्यात येईल.”

इन्स्टा पोस्ट-

आलियाचे वडील महेश भट्ट यांनी लग्नाबाबत कोणतीच प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. माध्यमांनी लग्नाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी असं सांगितलं की रणबीरची आई नीतू कपूर यांनी काहीच न बोलण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मी त्यांनी विनंती कशी टाळू शकतो, असं महेश भट्ट म्हणाले.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर रणबीर-आलियाने लग्नाची तारीख निश्चित केली. जवळपास गेल्या चार-पाच वर्षांपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. लग्नासाठीच त्यांनी इतर कामातून ब्रेक घेतल्याचंही कळतंय. या चित्रपटात रणबीर-आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: “लवकरच बाबा हो आणि..”; लग्नाच्या चर्चांवर संजय दत्तचा रणबीर कपूरला सल्ला

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या प्रेमकहाणीला कधी, कुठे अन् कशी सुरुवात झाली?

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....