Box Office: ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ची दमदार कामगिरी; ‘खुदा हाफिज 2’ पडला फिका तर ‘जुग जुग जियो’ची कमाई सुरूच

हॉलिवूड चित्रपट 'थॉर'ला भारतात जबरदस्त ओपनिंग मिळाली असताना जुग जुग जियोने 16 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तर विद्युतचा खुदा हाफिज 2 हा बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही चांगल्या प्रतिसादासाठी संघर्ष करत आहे.

Box Office: 'थॉर: लव्ह अँड थंडर'ची दमदार कामगिरी; 'खुदा हाफिज 2' पडला फिका तर 'जुग जुग जियो'ची कमाई सुरूच
सध्या बॉक्स ऑफिसवर तीन मोठे चित्रपट आहेत. Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 2:40 PM

सध्या बॉक्स ऑफिसवर तीन मोठे चित्रपट आहेत. यात मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ (Thor: Love and Thunder), वरुण धवनचा ‘जुग जुग जियो’ (JugJugg Jeeyo) आणि विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज 2’ (Khuda Haafiz: Chapter 2) यांचा समावेश आहे. हॉलिवूड चित्रपट ‘थॉर’ला भारतात जबरदस्त ओपनिंग मिळाली असताना जुग जुग जियोने 16 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तर विद्युतचा खुदा हाफिज 2 हा बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही चांगल्या प्रतिसादासाठी संघर्ष करत आहे. ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ने पहिल्या दिवशी 18.20 कोटी रुपयांची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 11.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली. सध्या थॉरने भारतात तीन दिवसांत एकूण 37 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘थॉर: लव्ह अँड थंडर’ची कमाई-

पहिला दिवस- जगभरात 23.48 कोटी रुपये/ देशभरात 18.20 कोटी रुपये दुसरा दिवस- जगभरात 14.71 कोटी रुपये/ देशभरात 11:40 कोटी रुपये तिसरा दिवस- जगभरात 21.68 कोटी रुपये/ देशभरात 16.80 कोटी रुपये चौथा दिवस- जगभरात 23.74 कोटी रुपये/ देशभरात 18.40 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

खुदा हाफिज 2 ची कमाई

विद्युत जामवाल आणि शिवालिका ओबेरॉय यांचा ‘खुदा हाफिज 2’ हा चित्रपट शुक्रवारी 8 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. फारुख कबीर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. ‘खुदा हाफिज 2’ने पहिल्या दिवशी 1.25 कोटी रुपयांची कमाई केली आणि शनिवारी त्यात थोडीशी वाढ झाली. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 1.75 कोटींचा गल्ला जमवत ‘खुदा हाफिज 2’ ने एकूण 3 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘खुदा हाफिज 2’चं बजेट जवळपास 15 कोटी रुपयांचं आहे.

जुग जुग जियोची कमाई

राज मेहता दिग्दर्शित जुग जुग जियोमध्ये वरुण धवन, नीतू कपूर, अनिल कपूर, कियारा अडवाणी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 24 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात त्याने 50 कोटींचा व्यवसाय केला आणि दुसऱ्या आठवड्यात 19 कोटींची कमाई केली. आता तिसऱ्या शुक्रवारी 85 लाख आणि शनिवारी पुन्हा एकदा तेजी दाखवत 1.60 कोटी रुपये कमावले. जग जुग जियोने आतापर्यंत भारतात 71.67 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.