मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. सलमान खान याला मिळणाऱ्या धमक्यांमुळे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीये. काही दिवसांपूर्वीच एक ईमेल करून सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. काही दिवसांपूर्वी लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने दिल्लीतील जेलमधून एक मुलाखत दिली होती, या मुलाखतीमध्ये देखील त्याने थेट सलमान खान याला जीवे मारणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर लगेचच सलमान खान याला ईमेल पाठवण्यात आला.
आता परत एकदा सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळालीये. मात्र, यावेळी फक्त सलमान खान यालाच नाही तर सलमान खान याच्यासोबतच राखी सावंत हिला देखील धमकी मिळालीये. सलमान खान याला लॉरेंस बिश्नोई याने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राखी सावंत ही सलमान खान याचा सपोर्ट करताना दिसली आणि माझा भाऊ सलमान खान याच्याकडून मी माफी मागते असे तिने म्हटले होते.
सलमान खान आणि राखी सावंत यांना लॉरेंस बिश्नोई ग्रुपकडून धमकी मिळाल्याने मोठा धक्का बसलाय. यावेळी राखी सावंत हिला ईमेलवर ही धमकी देण्यात आलीये. राखी सावंत हिला पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये लिहिण्यात आले आहे की, जय बालकारी लॉरेंस बिश्नोई ग्रुप /गोल्डी बरार ग्रुप…राखी, आमचे तुझ्याशी काही भांडण नाही, सलमान खान याच्या प्रकरणात तू मध्ये येऊ नकोस, नाही तर तुला खूप अडचणी होईल.
तुझा भाऊ सलमान खान याला आम्ही मुंबईतच मारून टाकू, त्याने सुरक्षा कितीही वाढवली तरी या वेळी सुरक्षेमध्येच त्याला मारणार आहोत. राखी हा तुझ्यासाठी शेवटचा इशारा आहे, अन्यथा तू पण तयार राहा…अशाप्रकारचा ईमेल राखी सावंत हिला पाठवण्यात आलाय. यामुळे आता सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. सलमान खान याने सततच्या धमक्यांमुळे सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीये.
गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक फोन आला आणि त्या फोनमध्ये सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिस हे अॅक्शनमध्ये आले होते. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते.