Throwback | कतरिना कैफला बांधायची होती अक्षय कुमारला राखी, इच्छा व्यक्त करताच अभिनेता म्हणाला..
अक्षय आणि कतरिनाला पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांना खूप आवडते. हेच कारण आहे की, चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने प्रतीक्षा करतात. पण, तुम्हाला हे माहिती आहे का, की पडद्यावर जरी ही जोडी रोमान्स करत असली तरी कतरिना कैफला अक्षय कुमारला राखी बांधायची होती...
मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांची जोडी चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जाते. सोनाक्षी सिन्हा-शाहिद कपूरपासून ते कतरिना कैफ (Katrina Kaif)-अक्षय कुमारपर्यंत (Akshay Kumar) अनेक जोड्यांचा या यादीत समावेश आहे. अक्षय आणि कतरिनाला पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांना खूप आवडते. हेच कारण आहे की, चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने प्रतीक्षा करतात. पण, तुम्हाला हे माहिती आहे का, की पडद्यावर जरी ही जोडी रोमान्स करत असली तरी कतरिना कैफला अक्षय कुमारला राखी बांधायची होती (Throwback things when Katrina Kaif wants to tie a rakhi to Akshay kumar).
अक्षय आणि कतरिनाने स्क्रीनवर आपल्या रोमान्सने अनेकांना वेड लावले आहे. पण पडद्यामागे या दोघांनीही एकमेकांचे खूप मस्करी केली आहे. अशा परिस्थितीत अलीकडेच एक असा किस्सा समोर आला आहे की, कतरिना कैफला अक्षय कुमारला राखी बांधायची होती. मात्र, तिची ही इच्छा अपुरीच राहिली.
कतरिनाला बांधायची होती राखी
2016मध्ये कतरिना कैफ करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये पोहोचली होती. यावेळी गप्पा मारताना कतरिनाने चाहत्यांना एक गमतीदार गोष्ट सांगितली होती. ‘तीस मार खान’ या चित्रपटाचे प्रसिद्ध गाणे ‘शीला की जवानी’चे शूटिंग करत असताना, तिला खिलाडी कुमारांला राखी बांधायची होती. हे तिने अक्षयला सांगितले देखील होते. पण अभिनेता त्यासाठी तयार नव्हता.
अक्षयचे उत्तर…
कतरिना कैफ म्हणाली की, त्यावेळी मी ज्या व्यक्तीचा आदर करेन आणि एक चांगला मित्र बनेल, अशा व्यक्तीचा शोध घेत होते. मग, मी अक्षयला विचारले की, मी तुला राखी बांधू शकतो? हे ऐकल्यानंतर अक्षयने म्हटलं होतं की, ‘कतरिना, तुम्हाला थप्पड हवी आहे का?’ अर्जुन कपूरलाही राखी बांधण्याची माझी इच्छा असल्याचे अभिनेत्रीने यावेळी सांगितले होते, पण अर्जुननेही कतरिना कैफला नकार दिला.
अक्षय आणि कतरिनाची हिट जोडी
अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांनी बर्याच उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोन्ही स्टार्सनी ‘हमको दीवाना कर गये’, ‘नमस्ते लंडन’, ‘सिंग इज किंग’, ‘तीस मार खान’, ‘दे दना दन’, ‘वेलकम’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत एकत्र काम केले आहे. आता जवळपास 10 वर्षांनंतर अक्षय-कतरिना ही जोडी पुन्हा ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन वर्षभरापासून लटकले आहे. हा चित्रपट आता 15 ऑगस्टच्या सुमारास रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे.
(Throwback things when Katrina Kaif wants to tie a rakhi to Akshay Kumar)