Yami Gautam | बाॅलिवूड इंडस्ट्रीमधील या त्रासाला कंटाळून यामी गाैतम हिने घेतला होता मोठा निर्णय
उरी: द सर्जिकल स्ट्राइक आणि बाला यासारख्या हीट चित्रपटांमध्ये यामीने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
मुंबई : अभिनेत्री यामी गाैतम हिने कमी वेळामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर बाॅलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केलीये. उरी: द सर्जिकल स्ट्राइक आणि बाला यासारख्या हीट चित्रपटांमध्ये यामीने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, यामीच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी आली होती की, तिने बाॅलिवूड सोडून जाण्याच्या देखील विचार केला होता. म्हणजे बाॅलिवूडमधील काही गोष्टींमुळे तिला हा निर्णय घ्यावा वाटत होता. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यामीने याबद्दल सांगितले आहे.
यामी म्हणाली मला वाटले होते की, इथे फक्त दिखाव्याला महत्व दिले जाते. मला फक्त माझे काम करायचे आहे. बाला चित्रपट नाॅमिनेट झाला नाही हे माझ्यासाठी खूप जास्त धक्कादायक होते.
View this post on Instagram
मी तेंव्हा असा विचार करत होते, बस झाले आता हे सर्व आणि मी यापुढे कोणताच चित्रपट करणार नाही. मला इंडस्ट्री सोडून जाण्याची इच्छा होती. यामी पुढे म्हणाली की, मी चांगले काम करूनही मला एक ओळख मिळत नव्हती.
यासर्व गोष्टींमुळे मी इंडस्ट्री सोडून जाण्याचे ठरवले होते. मुळात माझ्यासाठी अभिनय सर्वात जास्त प्रिय आहे. परंतू याचा अर्थ असा नाही की, दुसरे काहीच होऊ शकत नाही. मी खरोखरच तयार आहे.
View this post on Instagram
इतकेच नाहीतर माझ्या आईने देखील सांगितले की, ये इकडे…काहीही असो तुला झोप चांगली यायला हवी. आता यामी हिच्या मुलाखतीची चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे.
यामीने तिच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटामध्ये काम केले आहे. परंतू म्हणावी तशी ओळख मिळाली नसल्याचे तिला वाटते. उरी या चित्रपटामध्ये विकी काैशलसोबत यामी महत्वाच्या भूमिकेत होती.