Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | आतापर्यंत रहस्यच होत्या सलमानच्या आयुष्यातील काही गोष्टी, एक्स-गर्लफ्रेंडने केले मोठे खुलासे..

पाकिस्तानी-अमेरिकन अभिनेत्री सोमी अलीचे (Somy Ali) बॉलिवूडमध्ये छोटेसे करिअर होते. सोमी 'यार गद्दार', 'आंदोलन' आणि 'अंत' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. मात्र, अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त चर्चेत राहिले.

Salman Khan | आतापर्यंत रहस्यच होत्या सलमानच्या आयुष्यातील काही गोष्टी, एक्स-गर्लफ्रेंडने केले मोठे खुलासे..
Salman-Somy
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 11:17 AM

मुंबई : पाकिस्तानी-अमेरिकन अभिनेत्री सोमी अलीचे (Somy Ali) बॉलिवूडमध्ये छोटेसे करिअर होते. सोमी ‘यार गद्दार’, ‘आंदोलन’ आणि ‘अंत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. मात्र, अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त चर्चेत राहिले. सलमान खान (Salman Khan) आणि सोमी अलीचे नातेही त्याकाळात खूप गाजले. त्याचवेळी, आता सोमीने सलमान खानसोबतच्या लग्नाबाबत अनेक वर्षांनी खुलासा केला आहे.

सलमान खान आणि सोमी अली यांची ही प्रेमकथा 90च्या दशकाच्या सुरुवातीपासून सुरु झाली होती आणि त्यांचे नाते कोणापासूनही लपलेले नव्हते. अलीकडेच फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सोमीने खुलासा केला की, तिला अभिनेत्यावर प्रचंड क्रश होता. तिने सलमानशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ती म्हणाली, ‘आम्ही हिंदी चित्रपट बघायचो. मी ‘मैने प्यार किया’ पाहिला आणि मला सलमानवर क्रश झाला. त्या रात्री मला एक स्वप्न पडले आणि मी भारतात जाण्याचा निर्णय घेतला. मी 16 वर्षांची असताना मुंबईला जाऊन सलमानशी लग्न करू शकेन, असा विचार करणं माझ्यासाठी एक चेष्टाच होती.’ त्याच रात्री तिने सुटकेसमध्ये कपडे भरले आणि सलमानसोबत लग्न करण्यासाठी मुंबईला जात असल्याचे तिच्या आईला सांगितले.

सोमीने मांडला लग्नाचा प्रस्ताव

सोमी अलीने पुढे या घटनेबद्दल सांगितले जेव्हा तिने सलमानला लग्नासाठी प्रपोज केले होते. ती म्हणाली की, ‘आम्ही नेपाळला जात होतो. मी त्याच्या शेजारी बसलो होते. मी त्याचा फोटो काढला, त्याला दाखवला. मी त्याला म्हणाले की, ‘मी तुझ्याशी लग्न करायला मुंबईत आले आहे!’ मग तो म्हणाला, ‘माझी एक गर्लफ्रेंड आहे.’ मी म्हणाले, ‘काही फरक पडत नाही.’ त्यावेळी सोमी फारच लहान होती. सोमीने सांगितले की, वयाच्या 17 व्या वर्षी ते रिलेशनशिपमध्ये आले. अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘त्याने मला आधी सांगितले होते, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि हे मला पटले.’

वाढदिनी घडला अपघात

अलीकडेच सलमान खानने त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी बिनविषारी साप चावल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. अभिनेत्याने पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर मित्र आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला. आता त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. सलमान खान त्याची भाची आयत, त्याची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या मुलीसोबत केक कापताना दिसला आहे. छोट्या आयत शर्माने देखील तिचा वाढदिवस ‘सुलतान’ स्टारसोबत शेअर केला आहे. कारण, तिचा जन्म 27 डिसेंबर 2019 रोजी झाला होता, ज्या दिवशी सलमान खान 54 वर्षांचा झाला होता.

हेही वाचा :

Grammy Awards Postponed: ‘ग्रॅमी अवॉर्ड’ला ओमिक्रॉन चा मोठा फटका, जानेवारीत होणारा पुरस्कार सोहळा लांबणीवर!

Shilpa Shetty-Raj Kundra | नव्या वर्षात पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने शेअर केला राज कुंद्रासोबतचा व्हिडीओ, जोडीने घेतलं शिर्डीत दर्शन!

Happy Birthday AR Rahman | पोटासाठी मिळेल ते काम करणारा तरुण ते 2 ऑस्कर पटकावणारा ‘मोझार्ट ऑफ मद्रास’, रहमान चा थक्क करणारा प्रवास!

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.