‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या बहुप्रतीक्षित पोस्टरचे अनावरण, सलमान खानच्या विरुद्ध दिसणार आयुष शर्मा!
सलमान खान (Salman Khan) फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' च्या (Antim : The Final Truth) पहिल्या पोस्टरचे अनावरण आज (7 सप्टेंबर) करण्यात आले. या चित्रपटातून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांची झलक या पोस्टरद्वारे मिळते आहे.
मुंबई : सलमान खान (Salman Khan) फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ च्या (Antim : The Final Truth) पहिल्या पोस्टरचे अनावरण आज (7 सप्टेंबर) करण्यात आले. या चित्रपटातून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांची झलक या पोस्टरद्वारे मिळते आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोखून बघत आहेत यावरून हे स्पष्ट आहे की, ही लढाई अंतिम असेल.
पोस्टरचे डिजाइन इंटेंस आहे आणि दोन प्रमुख पुरुषांमधला एक महाकाय संघर्ष यातून दिसतो आहे. चित्रपट ‘अंतिम’चे कथानक मुख्यत्वे करून पोलीस आणि वेगवेगळ्या विचारधारांचे गैंगस्टर यांच्या आसपास फिरते. दोन नायक असलेला हा चित्रपट, ‘अंतिम’ पूर्णपणे दोन वेगवेगेळी विश्व आणि विचारधारांच्या दोन नायकांमधील संघर्षाला समोरा-समोर आणते, ज्यातून एक भयकंपित आणि अंगावर काटा आणणारा भयानक अंत पहायला मिळतो.
पाहा पोस्टर :
View this post on Instagram
ही पहिलीच वेळ आहे जेव्हा, सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांसोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार आहेत. सलमान खान फिल्म्स द्वारा प्रस्तुत, ‘अंतिम’ सलमा खान द्वारा निर्मित आणि महेश मांजरेकर यांच्याद्वारे दिग्दर्शित आहे.
गुपचूप केली ‘अंतिम’ची शूटिंग
सलमान खानने कुठेही काहीही उघड न करता अत्यंत गुपचूपपणे महेश मांजरेकरच्या या गँगस्टर सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात केली. सलमान खान गेल्या 6 डिसेंबरपासून या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. या सिनेमात सलमान खान पहिल्यांदा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
या सिनेमात आयुष कुख्यात गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात सलमान खान आणि आयुषसोबत निकितन धीरही मुख्य भूमिकेत दिसतील.
अशी असेल सलमानची भूमिका
सलमान या सिनेमात एका शिख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा अधिकारी त्याच्या हद्दीतील गँगवॉर आणि भू-माफियांना संपवण्याच्या मिशनवर असतो. ऑक्टोबरमध्ये अॅक्शन थ्रिलर ‘राधे’ या सिनेमाची शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्याने नवीन सिनेमाचं शूटिंग सुरु केलं. पण, त्यासाठी त्याने थोडा वेळ घेतला. कारण, ‘राधे’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तो क्लीन शेव्हमध्ये दिसला होता. त्यानंतर दाढी वाढवण्यासाठी त्याने काही दिवस वेळ घेतला होता.
मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक
अभिनेता-लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ (Marathi Film Mulshi Pattern) हा चित्रपट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट त्या वर्षातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. यानंतर या चित्रपटाच्या हिंदी रीमेकची घोषणादेखील झाली होती. ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या हिंदीतील ‘मुळशी पॅटर्न’मध्ये अभिनेता आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर आता ‘मुळशी पॅटर्न’ आणखी तीन दाक्षिणात्य भाषांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा स्वतः प्रवीण तरडे सांभाळणार आहेत.