‘उर्फी जावेद’ला या देशामध्ये प्रवेश बंदी? वाचा काय घडले, अभिनेत्रीच्या अडचणींमध्ये वाढ

त्यानंतर जया बच्चन जे काही बोलल्या होत्या. त्यानंतर तो व्हिडीओ पाहून उर्फीने टीका केली होती.

'उर्फी जावेद'ला या देशामध्ये प्रवेश बंदी? वाचा काय घडले, अभिनेत्रीच्या अडचणींमध्ये वाढ
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 8:24 PM

मुंबई : उर्फी जावेद तिच्या हटके फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. मात्र, उर्फीला कोणाच्याच बोलण्याचा काही फरक पडत नाही. जे लोक उर्फीवर तिच्या कपड्यांवरून टीका करतात, अशा लोकांना उर्फी कायमच उत्तर देत असते. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिने थेट जया बच्चन यांच्यावर टीका केली होती. एक पापाराझी हा जया बच्चन यांचे फोटो काढताना पडता पडता वाचला होता, त्यानंतर जया बच्चन जे काही बोलल्या होत्या. त्यानंतर तो व्हिडीओ पाहून उर्फीने टीका केली होती.

उर्फी जावेद दररोज हटके कपडे घालते, विशेष म्हणजे काही लोकांना उर्फीची ही खास स्टाईल आवडते देखील उर्फी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करते.

नुकताच उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक फोटोही शेअर केला आहे. उर्फी म्हणते आहे की, यापुढे मला UAE ला जाता येणार नाहीये, उर्फीची ही पोस्ट पाहून अनेक चर्चांना उधाण आले आहे.

urfi javed

अनेकांना वाटत आहे की, उर्फीच्या कपड्यांमुळे तिला UAE मध्ये बंदी घालण्यात आलीये. मात्र, हे कारण अजिबातच नाहीये. या पोस्टमध्ये उर्फीने कारण देखील सांगून टाकले आहे.

उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अजिबात अरब देशांमध्ये बंदी घातली नाहीये. मात्र, उर्फीच्या पासपोर्टवर फक्त सिंगल नाव असल्याने तिला आता यापुढे अरब देशांमध्ये जाता येणार नसल्याचे स्वत: उर्फीने म्हटले आहे.

पोस्ट शेअर करत उर्फीने म्हटले आहे की, माझे अधिकृत नाव आता फक्त UORFI आहे, आडनाव नाही…नवीन नियमानुसार आता मला UAE मध्ये जाता येणार नाहीये. आता उर्फीची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.