मुंबई : उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा उर्फी जावेद (Uorfi Javed) हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही आजारी आहे. मात्र, असे असतानाही उर्फी जावेद ही चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरणे उर्फी जावेद हिला बलात्कार करून थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर उर्फी जावेद हिने पोलिसात (Police) तक्रार दिली आणि पोलिसांनी या व्यक्तीला बिहारमधून अटक केली. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्या फॅशनमुळे एक खास ओळख नक्कीच मिळवली आहे.
उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, बिग बाॅस ओटीटीपासून तिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकते.
उर्फी जावेद हिला आता चक्क एका दिग्दर्शकाच्या ऑफिसमधून मारण्याची धमकी देण्यात आलीये. इतकेच नाही तर या प्रकरणात उर्फी जावेद हिने थेट पोलिसांमध्ये धाव घेतलीये. उर्फी जावेद हिने दिग्दर्शका विरोधात FIR देखील दाखल केलीये. एका दिग्दर्शकाने उर्फी जावेद हिला चक्क धमकी दिल्याने अनेक चर्चांना उधाण फुटले आहे.
उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे परत एकदा मारण्याची धमकी देण्यात आलीये. उर्फी जावेद हिने मोठा खुलासा करत म्हटले आहे की, दिग्दर्शक नीरज पांडेच्या ऑफिसमधून फोन करून मला सतत मारण्याची धमकी ही दिली जात आहे. उर्फी जावेद म्हणाली की, मला एका व्यक्तीचा फोन आला आणि तो व्यक्ती म्हणाला मी दिग्दर्शक नीरज पांडेच्या ऑफिसमधून बोलत आहे. मला तुला भेटायचे आहे आणि मी तुला स्क्रिप्ट पाठवले आहे, यावर मी त्याचवेळी नकार दिला.
मी नकार दिल्याने तो व्यक्ती नाराज झाला आणि त्याने म्हटले की, तू नीरज पांडेचा अपमान केला. तो व्यक्ती मला पुढे म्हणाला की, ज्यापध्दतीचे तू कपडे घालते, तुला तर मारून टाकायला हवे. हे ऐकून उर्फी जावेद ही घाबरली. त्यानंतर उर्फी जावेद हिने थेट पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. आता पोलिस पुढे काय कारवाई करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे यापूर्वीही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.