Video | उर्फी जावेदने शेअर केला टॉपलेस व्हिडिओ, नेटकऱ्यांनी घेतला समाचार
उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत जोरदार समाचार घेताना दिसत आहेत.
मुंबई : आपल्या फॅशन सेन्समुळे कायमच उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत असते. बऱ्याच वेळा उर्फीला कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र, उर्फी ट्रोलर्संना देखील सडेतोड उत्तर देते. पुन्हा एकदा उर्फी तिच्या विचित्र स्टाइलमुळे चर्चेत आलीये. शनिवारी उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ (Video) शेअर केलाय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओवर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कारण उर्फीने या व्हिडीओमध्ये असे काहीतरी केले आहे की, तिला ट्रोलिंग (Trolling) केले जात आहे.
इथे पाहा उर्फी जावेदने शेअर केलेला व्हिडीओ
View this post on Instagram
उर्फी जावेदने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने पूर्ण कपडे घातले नसून शंखाने तिचे शरीर झाकले आहे. शंखाचा देखील अशाप्रकारे उपयोग होऊ शकतो हे लोकांना उर्फीच्या या व्हिडीओवरूनच समजले. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत जोरदार समाचार घेताना दिसत आहेत.
उर्फीच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘आयकॉन.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘युनिक कॉन्सेप्ट…एक युजर कमेंट करत उर्फीला म्हणाला की, अहो मॅडम, तुम्ही कधीच सुधरणार नाहीत. एकाने लिहिले की, कधीतरी लाज बाळगा, आता फक्त हेच बघायचे राहिले होते. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये उर्फी पूर्णपणे टॉपलेस आहे.