Video: Urvashi Rautela झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार! लाइव्ह इव्हेंटमध्ये घडला हा प्रकार

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या आलिशान लाइफस्टाइल आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. फॅशनविश्वात उर्वशीने स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Video: Urvashi Rautela झाली 'Oops' मूमेंटची शिकार! लाइव्ह इव्हेंटमध्ये घडला हा प्रकार
Actress Urvashi Rautela Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 12:46 PM

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या आलिशान लाइफस्टाइल आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. फॅशनविश्वात उर्वशीने स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. बुर्ज अल अरबमध्ये (Burj Al Arab) लाइव्ह परफॉर्म करणारी ती पहिली भारतीय कलाकार ठरल्याची माहिती उर्वशीने नुकत्याच एका पोस्टद्वारे दिली. यावेळी तिने निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. या लाइव्ह परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मंचावर अत्यंत आत्मविश्वासाने परफॉर्म करताना उर्वशी ‘oops’ मूमेंटची शिकार झाली. वेळीच सावरून उर्वशीने तो परफॉर्मन्स पूर्ण केला आणि प्रेक्षकांना त्याची जाणीव होऊ दिली नाही.

उर्वशीने बॉलिवूडमध्ये फारसे चित्रपट केले नाहीत. मात्र सौंदर्यामुळे आणि बोल्ड अंदाजामुळे ती नेहमीच प्रकाशझोतात असते. तिला ‘इंडियाज प्राइड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याच वेळी उर्वशीने 50 हजार प्रेक्षकांसमोर परफॉर्म केलं. या परफॉर्मन्सदरम्यान उर्वशीने एक गाणंसुद्धा गायलं असून त्याला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली. सेव्हन स्टार हॉटेल बुर्ज अल अरबच्या टॉप फ्लोअरवर उर्वशीने परफॉर्म केलं.

उर्वशीचा लाइव्ह परफॉर्मन्स-

उर्वशीचे इन्स्टाग्रामवर साडेचार कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने ‘मिस दिवा युनिव्हर्स 2015’चा मुकूट जिंकला होता. मिस युनिव्हर्स 2015 स्पर्धेत तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. इतरही विविध सौंदर्यस्पर्धांमध्ये उर्वशी परीक्षक म्हणून सहभागी होते. 2013 मध्ये तिने ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी 4’ आणि ‘पागलपंती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली.

हेही वाचा:

Halal Meat Row: ‘जर हलाल या शब्दाचा इतका त्रास होत असेल तर..’; हलाल मांसाच्या वादावर लकी अलींची पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte: ‘नाहीतर लोक मला जोड्याने मारतील’, मेधाताईंसोबतच्या सीन्सबद्दल अनिरुद्धची लेखिकेला खास विनंती

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.