ऊंचाई चित्रपटाने 10 दिवसांमध्ये तब्बल केले इतक्या कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन
यादरम्यान अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाने बाॅलिवूडला एक नवीन उम्मीद नक्कीच दिली आहे.
मुंबई : अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनुपम खेर देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. कोरोनाच्यानंतर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास धमाल करू शकत नाहीयेत. सातत्याने बाॅलिवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातंय. यादरम्यान अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाने बाॅलिवूडला एक नवीन उम्मीद नक्कीच दिली आहे. कारण अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर जान्हवी कपूरचा मिली, सोनाक्षी सिन्हाचा डबल XL आणि कतरिना कैफचा फोन भूत हे चित्रपट रिलीज झाले होते. मात्र, या तिन्ही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फक्त बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिससवर फ्लाॅप जात आहेत. साऊथचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहेत. यामुळे बिग बजेटवाले चित्रपट निर्माते रिलीज करण्याच्या अगोरदर 100 वेळा विचार करत आहेत.
बाॅलिवूडचा चित्रपट कोणताही असो, त्याची रिलीज डेट जाहिर झाली की, लगेचच बहिष्काराची मोहिम सोशल मीडियावर सुरू होते आणि याचाच फटका चित्रपटांना बसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
बाॅलिवूडचे तीन चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काहीच करू शकले नसल्याने अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काय करणार हा प्रश्न उपस्थित केला जा होता. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या ऊंचाई या चित्रपटाने धडाकेबाज ओपनिंग केली.
अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट तीन मित्रांच्या मैत्रीवर आधारित आहेत. या चित्रपटाने आता 10 दिवसांमध्ये बाॅक्स ऑफिसवर तब्बल 23.88 कोटींची कमाई केलीये. अजूनही या चित्रपटांकडे कमाईच्या मोठ्या अपेक्षा आहेत.