नीतू कपूरनंतर वरुण धवनने केली कोरोनावर मात, लवकरच चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार!

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन काही दिवसांमध्येच आपल्या आगामी 'जुग जुग जियो' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हजर होणार आहे.

नीतू कपूरनंतर वरुण धवनने केली कोरोनावर मात, लवकरच चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार!
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 12:01 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन काही दिवसांमध्येच आपल्या आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हजर होणार आहे. चंदीगडमध्ये शूटिंग दरम्यान वरुण आणि नीतू कपूर कोरोनाची लागण झाली होती. मात्र, नीतू कपूरची मुलगी रिद्धिमा हिने तिच्या आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आता वरुणच्या चाहत्यांसाठीही एक चांगली बातमी आहे. वरुणचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नीतू कपूर, वरुण धवन आणि दिग्दर्शक राज मेहता कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग तीन आठवड्यांसाठी थांबले होते. (Varun Dhawan beat Corona, will soon start shooting for the film)

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

मिड डेच्या रिपोर्टनुसार आता 17 डिसेंबरपासून चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होत आहे. कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि प्राजक्ता कोळी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतात. काही दिवसांनंतर नीतू कपूर आणि वरुण धवनही त्यांच्यात सामील होतील. मनीष पॉल देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तेही लवकरच आता सेटवर परत येतील.

वरुणने पोस्ट शेअर करून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्याने एक फोटो शेअर करत लिहिले होते की, कोरोनाचा काळ संपल्यानंतर आम्ही चित्रपटाचे काम सुरू केले होते. शूटिंगच्या वेळी आम्ही सर्व खबरदारी घेतली होती. मात्र, तरीही कोरोना झाला. म्हणून कृपया खूप काळजी घ्या.

दुसरीकडे, नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमाने पोस्ट शेअर करून आईचा कोरोना रिपोर्ट आता निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. रिद्धिमा कपूरने तिच्या आईबरोबर एक फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये रिद्धिमाने लिहिले आहे की तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद. ‘जुग जुग जिओ’ चित्रपटामध्ये वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता करीत आहेत.

नीतूने इंस्टाग्रामवर लिहिले होते की, “या आठवड्याच्या सुरुवातीला मला मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले आहे. सर्व सुरक्षा उपायांचे पालन केले जात आहे. सर्व प्रशासनाचे आभारी आहे. मी स्वत: ला वेगळे ठेवले आहे आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार औषधे घेत आहे आणि बरे वाटत आहे. ” चंदिगडमध्ये नीतू कपूर तिच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये होत्या. आणि त्याच वेळी 4 डिसेंबर रोजी बातमी समोर आली होती की, तिचे सहकलाकार वरुण धवन तसेच चित्रपटाची दिग्दर्शक राज मेहता कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

संबंधित बातम्या :

Birthday Special : दिवसाला 40 अंडी आणि 8 तास व्यायाम, भल्लालदेवच्या भूमिकेसाठी राणाची खास मेहनत

मला पट्ट्याने मारलं, लैंगिक शोषण केलं, माझा नवरा हैवान आहे; दिव्या भटनागरच्या चॅटमधील खुलासा

(Varun Dhawan beat Corona, will soon start shooting for the film)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.