AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varun Weds Natasha | आशिक सरेंडर हुआ, वरुण धवन-नताशा दलाल विवाहबंधनात

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर आज (24 जानेवारी) विवाहबंधनात अडकला. (Varun Dhawan Married With Natasha Dalal in Alibaug)

Varun Weds Natasha | आशिक सरेंडर हुआ, वरुण धवन-नताशा दलाल विवाहबंधनात
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 12:55 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर आज (24 जानेवारी) विवाहबंधनात अडकला. वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलालसोबत लगीनगाठ बांधली. या दोघांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या साक्षीने सप्तपदी घेतली. अलिबागमध्ये अगदी मोजक्या कुटुंबाच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. यात लग्नसोहळ्यात फक्त 50 जण सहभागी झाले होते. (Varun Dhawan Married With Natasha Dalal in Alibaug)

वरुण आणि नताशाच्या लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो समोर आले आहे. यात वरुणने गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती. तर नताशाने त्याला मॅचिंग असा लेहंगा घातला होता. यावेळी ते दोघेही फार आनंदी दिसत होते.

फेब्रुवारीत मुंबईत रिसेप्शन

वरुण आणि नताशाच्या लग्नानंतर आता त्यांचे रिसेप्शन कुठे होणार, यावर अनेक चर्चा समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण आणि नताशा या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन पुढील आठवड्यात मुंबईत ठेवले जाणार आहे. येत्या 2 फेब्रुवारीला मुंबईत रिसेप्शन आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. हे रिसेप्शन पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या रिसेप्शनला संपूर्ण बॉलिवूड सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाहरुख खान, कॅटरीना कैफ, जॅकलीन फर्नांडिस, श्रद्धा कपूर यांसारखे कलाकार सहभागी होऊ शकतात.

हनिमूनसाठी टर्कीला जाणार

वरुण आणि नताशा हनिमूनसाठी टर्की या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान लग्नानंतर वरुण आणि नताशा दोघेही वेगळ्या घरात राहणार आहेत. काही वर्षांपूर्वी वरुणने एका उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केला होता. याच फ्लॅटमध्ये हे दोघेही राहायला जाणार आहे. विशेष म्हणजे लग्नापूर्वीच नताशाने हा फ्लॅट तिच्या मनाप्रमाणे डेकोरेट केला आहे.

कोण आहे नताशा दलाल?

नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे. तसेच ती स्केच आणि डॉग लव्हर आहे. (Varun Dhawan Married With Natasha Dalal in Alibaug)

संबंधित बातम्या : 

Varun Ki Shaadi PHOTO : वरुण नताशा विवाहबंधनात, पाहा लग्नाचे खास फोटो

डोळ्यावर गॉगल, ट्रॅडिशनल आऊटफिट; वरुण धवनच्या मेहंदीचे फोटो पाहिलेत का?

आम्ही पाकिस्तानी नाही, बलुचिस्तानी! बलुचिस्तानची स्वातंत्र्याची घोषणा
आम्ही पाकिस्तानी नाही, बलुचिस्तानी! बलुचिस्तानची स्वातंत्र्याची घोषणा.
सोफिया कुरेशींबद्दल वक्तव्य, भाजप मंत्र्यावर गुन्हा अन् कोर्टात धाव
सोफिया कुरेशींबद्दल वक्तव्य, भाजप मंत्र्यावर गुन्हा अन् कोर्टात धाव.
पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा
पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा.
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा.
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा.
गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम - मुख्यमंत्री फडणवीस
गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम - मुख्यमंत्री फडणवीस.
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार.
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ.
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.