गोविंदाला अभिनेता म्हणून घडविणाऱ्या दिग्दर्शकाचा मृत्यू; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

इस्माइल श्रॉफ यांनी गोविंदाशिवाय अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं. राजेश खन्ना, धर्मेंद्र, राजकुमार आदी अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं.

गोविंदाला अभिनेता म्हणून घडविणाऱ्या दिग्दर्शकाचा मृत्यू; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
गोविंदाला अभिनेता म्हणून घडविणाऱ्या दिग्दर्शकाचा मृत्यूImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 9:19 AM

मुंबई: अहिस्ता अहिस्ता, बुलंदी आणि थोडी सी बेवफाई आदी दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शक (film Director) इस्माइल श्रॉफ (Esmayeel Shroff) यांचं बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या इस्माइल श्रॉफ यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची बुधवारी रात्री प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते 62 वर्षाचे होते. इस्माइल श्रॉफ यांनी प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचं करियर घडवलं होतं. ते हे बॉलिवूडमधील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर (Bollywood) शोककळा पसरली आहे.

इस्माइल श्रॉफ यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यामुळे त्यांच्यावर कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काल रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला.

हे सुद्धा वाचा

इस्माइल श्रॉफ यांनी 80 आणि 90 च्या दशकाचा काळ गाजवला होता. त्यांनी अनेक सुपरडुपर हिट सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. अहिस्ता अहिस्ता, बुलंदी, थोडी सी बेवफाई, सूर्या आदी सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. इस्माइल श्रॉफ यांचं खरं नाव एस. व्ही. इस्माइल होतं. पण सिनेमात त्यांची ओळख इस्माइल श्रॉफ अशीच होती.

इस्माइल श्रॉफ यांच्या निधनावर बॉलिवूडमधून शोक व्यक्त होत आहे. अभिनेता गोविंदानेही श्रॉफ यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. गोविंदाने बॉलिवूडमध्ये लव्ह 86 या सिनेमातून पदार्पण केलं होतं. इस्माइल श्रॉफ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

श्रॉफ यांच्या निधनामुळे मी फार उदास आहे. माझ्या करियरची सुरुवात त्यांच्या सोबत झाली होती. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दात गोविंदाने दु:ख व्यक्त केलं.

त्यांनी मला केवळ कामच दिलं नव्हतं तर माझ्यावर विश्वास टाकला होता. गोविंदाला सिनेमाची समज आहे, असं सांगणारे माझ्या आयुष्यातील ते पहिले व्यक्ती होते. मला गोविंदा म्हणून घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असंही गोविंदाने सांगितलं.

इस्माइल श्रॉफ यांनी गोविंदाशिवाय अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं. राजेश खन्ना, धर्मेंद्र, राजकुमार आदी अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं. तर, शबाना आझमी आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबतही त्यांनी काम केलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.