RIP Lata Mangeshkar : ‘मेरी आवाजही पहचान है…’, लतादिदींची ओळख असलेली 10 अजरामर गाणी

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या रूपाने गायकीतील लखलखता तारा निखळला आहे. पण लता दिदींची ओळख त्यांची गाणी आहेत. त्यांची टॉप 1o गाणी पाहुयात...

RIP Lata Mangeshkar : 'मेरी आवाजही पहचान है...', लतादिदींची ओळख असलेली 10 अजरामर गाणी
भारतरत्न लता मंगेशकर
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 12:02 PM

मुंबई : लता मंगेशकर (Lata Mangeshkar) म्हणजे संगीतातील पूर्णविराम. त्यांच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमीं मंत्रमुग्ध होत असत. म्हणूनच त्यांना संगीतातील गानसरस्वती म्हटले जायचे. आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील. ‘नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ ही पहचान है ग़र साथ रहे… !’ लतादिदी यांनी गायलेल्या या गाण्याप्रमाणे आज शरीराने जरी त्या नसल्या तरी त्यांचे स्वर कायम आपल्यात राहतील. लतादीदींच्या निधनाने मंगेशकर कुटुंबियांवर व संगीतप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

लता दिदींच्या अविट सुरातील टॉप 10 गाणी

‘मेरी आवाजही पहचान है मेरी…’ हे लतादिदींचं गाणं म्हणजे त्यांच्या जिवनाचं वर्णन करणारं आहे. लता दिदींची विशेष ओळखही त्यांचा आवाज आहे… आणि त्यांची ही जोवर सूर्य चंद्र आहे तोवर लता मंगेशकर यांची ही ओळख कायम राहिल.

‘लग जा गले…’ हे गाणं म्हणजे लता दिदींच्या गायकीचा सर्वोच्च बिंदू ठरला. त्यांचं हे गाणं 58 वर्षानंतरही तितकंच फ्रेश आहे.

‘सत्यम शिवम सुंदरम्’ हे गाणे लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत दिलं.

‘ऐ मेरे वतन के लोगों’ लतादिदींचं हे गाणं म्हणजे राष्ट्रप्रेमाने ओतप्रेत भरलेली देशवासियांना घातलेली भावनिक साद… तुमच्या माझ्या मनातलं देशप्रेम त्यांच्या आवाजातून व्यक्त होतं, असंच हे गाणं ऐकताना जाणवतं.

‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा’ हे ‘आंधी’ चित्रपटातील गाणं आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं म्हणजे जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने बघायला शिकवतं.

‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणे लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातील आहे. हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकच रहावंसं वाटत.

श्रावणात घन निळा बरसला : निसर्गाची विलोभनीय रुपं उलगडणारा, ऊन-पावसाच्या रोमांचक अनुभूतीचा आणि संपूर्ण सृष्टीवर हिरव्यागार पाचूंची मुक्त उधळण करणारा श्रावण हा सगळ्यांच्याच आवडीचा ऋतू. याचं ऋतुचं वर्णन करणारं गीत लता मंगेशकर यांच्या गळ्यातून निघालं, ‘श्रावणात घन निळा बरसला…. रिमझिम रेशीमधारा.. उलगडला झाडांतूनी अवचित हिरवा मरपिसारा…’ पाडगावकरांची कविता, श्रीनिवास खळेंचे संगीत आणि लतादीदींचा स्वर, या त्रिवेणी संगमाने तयार झालेले हे एक अजरामर गीत दर वर्षी पावसाळ्यात हमखास आठवते.

‘मोगरा फुलला… फुले वेचिता बहरु कळियासी आला’ हे एक अजरामर गीत लतादिदींच्या सुमधूर गळ्यातून निघालं. मोगरा फुलण्याचं उमलणं किती तरल असू शकते, हेच दीदींच्या गाण्यातून अनुभवाला मिळालं.

‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे’ हे ‘साधी माणसं’ या चित्रपटातील हे गाणं आजही ऐकताना तितकंच ताजं आणि काळाशी अनुरूप वाटतं. जगदीश खेबुडकर यांचे शब्द आणि लतादिदींचा आवाज म्हणजे संगीतसरितेचा निखळ प्रवाह…

शेतकरी कुटुंबातील एक सासुरवाशीण… घरातली पुरुषमाणसं शेताच्या कामाला बाहेर पडली आहेत. घरातली कामं उरकून लगबगीनं स्वत:चं आवरत सावरत असताना तिला अचानक माहेरची आठवण आली. ‘वाटेनं माहेराच्या धावत मन जातं’ असं म्हणत ती माहेरच्या स्मृतीत रमली आहे. तिच्याच मनातला विचार लतादिदींनी मधुर आवाजात गायलाय.. ‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं…!’

संबंधित बातम्या

लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार; शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | 3 महिन्यांच्या तो कठीण काळ, जेव्हा लता मंगेशकर यांनी एकही गाणं रेकॉर्ड केलं नाही, कारण

Lata Mangeshkar | सुरांची श्रीमंती तर होत्याच, पण दीदी तितक्याच वैभवसंपन्नही होत्या! लता मंगेशकरांची प्रॉपर्टी माहितीये का कितीये?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.