‘Sardar Udham’ची मेहनत दाखवताना विकी कौशलने शेअर केला पाठीवरच्या वळांचा फोटो, चाहतेही झाले स्तब्ध!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या 'सरदार उधम' (Sardar Udham) चित्रपटामुळे चर्चेत आहे. कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. प्रत्येकजण अभिनेत्याच्या जबरदस्त अभिनयाचे कौतुक करत आहे.

‘Sardar Udham’ची मेहनत दाखवताना विकी कौशलने शेअर केला पाठीवरच्या वळांचा फोटो, चाहतेही झाले स्तब्ध!
Vicky Kaushal
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 10:57 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या ‘सरदार उधम’ (Sardar Udham) चित्रपटामुळे चर्चेत आहे. कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. प्रत्येकजण अभिनेत्याच्या जबरदस्त अभिनयाचे कौतुक करत आहे. चित्रपटातील त्याचा लूक इतका प्रभावी दिसतो की, जणू सरदार उधम सिंहचे पात्र त्याने जिवंत केले आहे.

अभिनेता विकी कौशल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. आजकाल विकी त्याच्या चर्चित चित्रपटाचे आणि त्याच्या सेटवरचे फोटो शेअर करत आहे.

रशियन मेकअप आर्टिस्टने केलाय मेकअप

विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘सरदार उधम’ मधील एका सीनमध्ये दाखवलेलं पाठीवरचे वळ काढणाऱ्या मेकअप आर्टिस्टसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा व्यक्ती रशियन कृत्रिम मेकअप कलाकार पीटर गोर्शेनिन आहे. त्यानेच विकीला असा जबरदस्त लूक तयार करून दिला आहे. पीटरने त्याच्या इंस्टाग्रामवर विकीसोबत एक मोनोटोन सेल्फी शेअर केला आहे. अलीकडेच, अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शूट दरम्यान एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या पाठीवर मोठे वळ दिसत आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कट्स जे कट केले नाही’.

पाहा पोस्ट :

चाहते या फोटोवर जोरदार कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हे पाहून कतरिना कैफ किती दुःखी झाली असेल.’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘उफ्फ! हे तुला कसं सहन करता आलं?’ या चित्रपटात जालियनवाला बाग नरसंहाराचा सीन पुन्हा तयार करण्यात आला आहे. हा चित्रपटाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. विकी कौशलने एका मुलाखतीत सांगितले होते की, जालियनवाला बागचा सीन शूट करणे खूप वेदनादायक होते. या दरम्यान, तो अनेक रात्री झोपू शकला नाही. विकी कौशल या चित्रपटात महान स्वातंत्र्य सेनानी सरदार उधम सिंह यांची भूमिका साकारत आहे. शुजित सरकार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

इरफान खान सरदार उधम सिंहचा बायोपिकमध्ये झळकणार होते!

यापूर्वी दिवंगत अभिनेते इरफान खान यांना सरदार उधम सिंहच्या बायोपिकमध्ये कास्ट केले जाणार होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे इरफानने हा चित्रपट नाकारला होता. अलीकडेच, इरफानची पत्नी सुतापाने एका मुलाखतीत सांगितले होते की, इरफान खान या चित्रपटासाठी खूप उत्साहित होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो हा चित्रपट करू शकला नाही. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर विकी कौशलला चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. अभिनेत्याने आपल्या चित्रपटाचे यश दिवंगत अभिनेते इरफान खान आणि सरदार उधम सिंह यांना एका मुलाखतीत समर्पित केले आहे.

हेही वाचा :

Star Kids : ‘या’ स्टार किड्सचं वय आहे 25 पेक्षा कमी, बिकिनी परिधान करत दाखवतात बोल्डनेसचा जलवा

Khoya Khoya Chand | ‘ब्लॅक’ या पहिल्याच चित्रपटातून पुरस्कारांवर नाव कोरणारी आयशा कपूर मनोरंजन विश्वातून गायब! नेमकं कारण काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.