Video : अनुष्का शर्माच्या अ‍ॅक्टिंग क्लासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा अ‍ॅक्टिंग स्किल्स

2008 मध्ये अनुष्कानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात करणार्‍या अनुष्का शर्मानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. (Video of Anushka Sharma's Acting Class went Viral on Social Media, Watch Acting Skills)

Video : अनुष्का शर्माच्या अ‍ॅक्टिंग क्लासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा अ‍ॅक्टिंग स्किल्स
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 11:51 AM

मुंबई : ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अनुष्का शर्मा आज बॉलिवूड इंडस्ट्रीची टॉप अभिनेत्री आहे. अनुष्काने तिच्या कारकीर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तिच्या अ‍ॅक्टिंग क्लासचा असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की अनुष्का आधीपासूनच एक उत्तम अभिनेत्री आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का तिच्या प्रोफेसरसोबत दिसत आहे. ती भावनिक सीन करत आहे.

अ‍ॅक्टिंग क्लासचा व्हिडीओ

अनुष्कानं फुल स्लीव्हजचं ब्लॅक टॉप आणि पीच कलरचा स्कर्ट परिधान केला आहे. सोबतच केस खुले आणि हलका मेकअप केला आहेत. व्हिडीओमध्ये आपण पाहाल की शूटिंगपूर्वी अनुष्कानं तिच्या डोळ्यांत ग्लिसरीन टाकलं आहे जेणेकरून तिच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर येतील. यानंतर अनुष्का तुम्हाला जबरदस्त अभिनय करताना दिसणार आहे.

पाहा व्हिडीओ

2008 मध्ये अनुष्कानं अभिनय करण्यास सुरवात केली. शाहरुख खानच्या चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात करणार्‍या अनुष्का शर्मानं पीके या चित्रपटात आमिर खान आणि सुलतानमध्ये सलमान खान यांच्याबरोबर काम केलं होतं. अनुष्का वर्ष 2018 मध्ये ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अनुष्कासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटानंतर अनुष्काने अभिनयातून ब्रेक घेतला होता.

ती निर्माता म्हणून सक्रिय आहे. अनुष्कानं तिच्या प्रॉडक्शन हाऊस क्लीन स्लेट फिल्म्सच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट रिलीज केले आहेत. मागील वर्षी, अनुष्काच्या बुल्बुल आणि पातल लोक या डिजिटल प्रकल्पांनी बरीच चर्चा झाली. आता अनुष्काचं प्रॉडक्शन हाऊस लवकरच इरफान खानचा मुलगा बबील खानला लाँच करणार आहे. बाबील ‘काला’ या चित्रपटाद्वारे डेब्यू करणार आहे.

तसं तर अनुष्का सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अनुष्का आई झाली आहे. मुलगी वामिकाला तिनं जन्म दिला आहे. सध्या ती इंग्लंडमध्ये विराट आणि मुलीसोबत असून तिथून ती फोटो शेअर करत असते.

संबंधित बातम्या

Bold Photo : अभिनेत्री संजीदा शेखच्या हॉटनेसचा तडका, ‘हे’ फोटो पाहाच

Father’s Day 2021 : ‘फादर्स डे’ निमित्त हीना खानची भावनिक पोस्ट, म्हणाली हे फोटो तुम्हाला दाखवले नाही कारण…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.