VIDEO : ‘जर्सी’साठी शाहिद कपूरनं गाळलं रक्त आणि घाम! टाके पडल्यानंतरही जोरदार फटकेबाजी!!

आपला प्रत्येक सीन हा उत्तम व्हावा, यासाठी अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आपलं सर्वस्व देतो. शाहिद बहुप्रतिक्षित जर्सी(Jersey)मध्ये त्याच्या त्याच्या अस्सल गुणांसह मोठ्या पडद्यावर वादळ आणण्यासाठी सज्ज झालाय.

VIDEO : 'जर्सी'साठी शाहिद कपूरनं गाळलं रक्त आणि घाम! टाके पडल्यानंतरही जोरदार फटकेबाजी!!
शाहिद कपूर
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 7:13 PM

मुंबई : आपला प्रत्येक सीन हा उत्तम व्हावा, यासाठी अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आपलं सर्वस्व देतो. शाहिद बहुप्रतिक्षित जर्सी(Jersey)मध्ये त्याच्या त्याच्या अस्सल गुणांसह मोठ्या पडद्यावर वादळ आणण्यासाठी सज्ज झालाय. अडीच वर्षांच्या कालावधीनंतर आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतूर झाले होते. ही प्रतीक्षा ३१ डिसेंबरला संपणार आहे. शाहिदनं जर्सीला आपलं रक्त आणि घाम दिलाय.. कसं ते पाहू..

प्रत्येक शॉट परफेक्ट जर्सीत क्रिकेटरची भूमिका साकारण्यासाठी शाहिद कपूरने कठोर आणि कठोर प्रशिक्षण घेतलं. भूमिका परिपूर्ण करण्यासाठी शाहिद कपूरनं आपलं सर्वस्व दिलंय. त्याला फक्त प्रत्येक शॉट अचूक बनवायचा नव्हता तर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या ओठांना दुखापतही झाली होती. 25 टाके पडल्यानंतरही शाहिद जर्सीसाठी जोरदार फलंदाजी करत मैदानावर परतला.

‘शाहिद परफेक्शनिस्ट’ सेटवर शाहिदच्या अॅक्सिडेंटविषयी निर्माता अमन गिल म्हणाले, की शाहिद एक परफेक्शनिस्ट आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु त्या दिवशी आम्ही जे पाहिले ते शाहिदच्या खऱ्या खिलाडूवृत्तीचं दर्शन होतं. टाके पडल्यानंतरही तो सेटवर परत आला. त्याच्या अभिनयाची आवड पाहून आम्ही सगळेच थक्क झालो. पडद्यावर परिपूर्ण जाण्यासाठी त्यानं आपलं सर्वस्व दिलंय. जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला ते नक्की जाणवेल.

31 डिसेंबरला होणार रिलीज हा चित्रपट 31 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रिलीजचं काउंटडाउन सुरू झालंय. अल्लू अरविंद (Allu Arvind)प्रस्तुत या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते गौतम तिन्ननुरी यांनी केलंय. अमन गिल, दिल राजू आणि एस नागा वामसी यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीय. यात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आहे तर शाहिदचे वडील पंकज कपूर प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Entertainment : ‘हे’ चित्रपट आणि वेब सिरीज या आठवड्यात मोठा पडदा आणि OTTवर होणार प्रदर्शित

Bigg Boss Season 15 : आता तर हद्द झाली..! अभिजित बिचुकलेच्या ‘या’ प्रतापानंतर सलमान खान घेणार क्लास

‘त्या’ ऑडिओ क्लिप खोट्या असल्याचं कोर्टात सिद्ध करून दाखवाच; सूर्यकांत दळवींचं कदमांना आव्हान

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...