Video | रिसेप्शनमधील व्हिडीओ तूफान व्हायरल, सिद्धार्थ मल्होत्रा याने मेहुणा आणि सासऱ्यासोबत…
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना लग्नामध्ये करण जोहर याने अत्यंत खास गिफ्ट दिले असून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना तब्बल तीन चित्रपटांमध्ये करण जोहर याने साईन केले आहे.
मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. अत्यंत शाही पध्दतीने यांचा विवाहसोहळा पार पडलाय. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. नो फोन पाॅलिशी या विवाहसोहळ्यात फाॅलो करण्यात आली होती. कियारा अडवाणी हिने लग्नसोहळ्यातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर करण जोहर आणि जुही चावला हिने देखील फोटो (Photo) शेअर केले. अगदी 100 ते 150 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला ईशा अंबानी हिने हजेरी लावली होती. तीन दिवस हा शाही विवाहसोहळा सुरू होता. यामध्ये अनेक खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत देखील या विवाहसोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. यासोबतच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचे बालपणीचे काही मित्र आणि मैत्रीणी देखील या विवाहसोहळ्यात उपस्थित होते.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना लग्नामध्ये करण जोहर याने अत्यंत खास गिफ्ट दिले असून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना तब्बल तीन चित्रपटांमध्ये करण जोहर याने साईन केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून सतत सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. हे दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र, लग्नापूर्वी यांनी कधीच आपल्या नात्यावर भाष्य केले नव्हते.
Sid, Kiara, Sid’s brother, Kiara’s Father, Kiara’s Brother Dancing on Burj khalifa ??❤❤#SidharthMalhotra #KiaraAdvani #SidKiaraReception #SidKiara pic.twitter.com/fnstIAcqAI
— Junior Sid Malhotra? (@Ranjanbharwaz1) February 13, 2023
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी अगोदर दिल्लीमध्ये रिसेप्शन ठेवले होते. नुकताच यांचे मुंबईमध्ये देखील रिसेप्शन पार पडले आहे. या रिसेप्शनला बाॅलिवूडच्या अनेक स्टारने हजेरी लावली होती.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या मुंबईतील रिसेप्शनमधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा याची एक्स प्रियसी अलिया भट्ट देखील दिसत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या रिसेप्शनमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, यातील एक व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा डान्स करताना दिसत आहे.
बुर्ज खलीफा या गाण्यावर सिद्धार्थ मल्होत्रा हा कियाराचा भाऊ म्हणजेच त्याच्या मेहुण्यासोबत आणि कियारा अडवाणी हिचे वडील म्हणजे सासऱ्यासोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.