Video | जयपूरमध्ये वरुण धवन फुल जोशमध्ये, पाहा क्रिती सेननसोबतचा व्हिडीओ
कालच्या एपिसोडमध्ये वरुण आणि क्रितीची जोडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बाॅसच्या घरात आली होती.
मुंबई : वरुण धवन आणि क्रिती सेनन यांचा बहुचर्चित चित्रपट भेडिया हा याच महिन्यात चाहत्यांच्या भेटीला येतोय. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या वरुण आणि क्रिती फुल बिझी आहेत. कालच्या एपिसोडमध्ये वरुण आणि क्रितीची जोडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बाॅसच्या घरात आली होती. यावेळी वरुण धवन आणि क्रिती सेनन यांनी सलमान खानसोबत मस्ती करत घरातील सदस्यांना एक खास टास्क दिला. आता वरुण आणि क्रिती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थेट जयपूरला पोहचले आहेत.
View this post on Instagram
जयपूरमधील चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात वरुण धवन फुल एनर्जीत दिसला. यावेळी चित्रपटाच्या एका गाण्यावर वरुण आणि क्रितीने जबरदस्त असा डान्स केला. यावेळी वरुणने क्रितीला उचलून घेत डान्स केला. आता याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. जंगल में कांड हे चित्रपटामधील गाणे यावेळी जयपूरमध्ये रिलीज करण्यात आले.
वरुण धवन आणि क्रिती सेनन त्यांच्या भेडिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये काहीच कमी सोडत नाहीयेत. भेडिया चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. टीझर व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड क्रेझ आहे. स्त्री चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यामुळे हा चित्रपट अधिक धमाकेदार होणार असल्याचे सांगितले जात आहे.