Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : उस्तादाप्रमाणे तबला वाजवतेय सारा अली खान, तरीही नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

सारा अली खान (Sara Ali Khan) अभिनयाबरोबरच तबला वादनातही माहिर आहे.

Video : उस्तादाप्रमाणे तबला वाजवतेय सारा अली खान, तरीही नेटकऱ्यांनी केले ट्रोल!
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 1:16 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) अभिनयाबरोबरच तबला वादनातही माहिर आहे. नुकताच साराने सोशल मीडियावर तिचा तबला वाजवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये सारा तबला वाजवताना दिसत आहे. मात्र, साराचा हा व्हिडीओ जोरदार ट्रोल होताना दिसत आहे. (Video troll of Sara Ali Khan playing the tabla)

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, तबला वाजवताना साराच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन काहीतरी वेगळेच दिसत असल्याने तिला ट्रोल केलं जात आहे. सारा सध्या आईसोबत राजस्थानमध्ये आहे. सारा तेथील फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. सारा आई अमृता सिंहसोबत अजमेरच्या खाजा गरीब नवाजच्या दर्गामध्ये गेली होती.

दर्गामधील एक फोटो शेअर केला होता. साराने फोटो शेअर करताना लिहिले होते की, जुमा मुबारक…सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर, ती अखेर ‘कुली नंबर 1’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. सारा अली खान दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या

‘अतरंगी रे’ मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारा करीनाच्या घरी जाताना दिसत होती. तिच्या हातात खास बाळासाठी आणि करीनासाठी भेटवस्तू असल्याचं पाहायला मिळाले होते. हा व्हिडीओ विरल भैय्यानी यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. करीना आणि सारा या दोघीं खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

बऱ्याच वेळा या दोघीही त्यांच्यातील नात्याविषयी उघडपणे व्यक्त झाल्या आहेत. करीनानेही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. विशेष म्हणजे सारा आणि तैमुर या दोघांमध्येही चांगली मैत्री आहे, सारा तैमुरच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते आणि त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देखील देते.

संबंधित बातम्या : 

हरभजन सिंह क्रिकेटनंतर अभिनय क्षेत्रात लावणार चौके-छक्के, पाहा ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचा टीझर!

कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट नेटफ्लिक्सवर करणार धमाल, पाहा टीझर 

Bigg Boss : ज्यांना दिल्या शिव्या त्यांच्याच सोबत राखी सावंतची पार्टी, शो स्क्रिप्टेड असल्याची चर्चा!

(Video troll of Sara Ali Khan playing the tabla)

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.