Satish Kaushik | सतीश कौशिक यांचे जिममधील व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का, तंदुरुस्त राहण्यासाठी…
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये त्यांचे जिममधील काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. सतीश कौशिक यांचे जिममधील व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
मुंबई : अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात मोठी शोककळा पसरली आहे. परवाच जोरदार पध्दतीने होळी सेलिब्रेट करताना सतीश कौशिक दिसले. सतीश कौशिक यांनी दिल्लीतील एका फार्महाऊसवर (Farmhouse) कुटुंबासोबत होळी साजरी केली. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सांगितली. आज त्यांचे पार्थिव हे मुंबईमध्ये आणले जाणार आहे.
सध्या सोशल मीडियावर सतीश कौशिक यांचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सतीश कौशिक हे जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी जिममध्ये घाम गाळताना सतीश कौशिक दिसत आहेत. सतीश कौशिक हे कायमच त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत असत.
View this post on Instagram
सतीश कौशिक यांचे हे जिममधील व्हिडीओ पाहून आता चाहत्यांना मोठा धक्का बसला असून अनेकांनी म्हटले आहे की, इतके फिट आणि चांगल्या आरोग्यासाठी जिममध्ये व्यायाम करणारे सतीश कौशिक यांना हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो? कारण प्रत्येक व्हिडीओमध्ये जिममध्ये व्यायाम करताना सतीश कौशिक दिसत आहेत.
सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 5 वाजता वर्सोवा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतून त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आता सोशल मीडियावर सतीश कौशिक यांचे होळीमध्ये काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सतीश कौशिक यांनी होळीच्या शुभेच्छा चाहत्यांना दिल्या होत्या. इतकेच नाहीतर 7 मार्च रोजी सतीश कौशिक हे मुंबईतील जुहू येथे शबाना आझमीच्या घरी होळीच्या पार्टीत सहभागी झाले होते. या होळी पार्टीमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. सतीश कौशिक यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना मोठा धक्का नक्कीच बसलाय.
सतीश कौशिक यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आहे. सकाळी अकराच्या सुमारास शवविच्छेदनाला सुरुवात झाली. त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेचे निशाण नसल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी दारूही प्यायली नसल्याचे बोलले जात आहे.