मुंबई : विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिनेमा हॉलमध्ये पहिल्याच दिवशी ‘लाइगर’ला प्रेक्षकांचा ठिक ठिक प्रतिसाद मिळालायं. दरम्यान, विजय देवरकोंडा आणि भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा लाइगर (Liger) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिनेमामध्ये पहिल्याच दिवशी ‘लायगर’ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. याच दरम्यान विजय देवरकोंडा आणि भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चर्चेचा विषय ठरलायं.
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह कायम चर्चेत असते. अक्षरा सिंहच्या चाहत्यांची संख्या देखील अतिशय जास्त आहे. अक्षरा सिंह विजय देवरकोंडासोबत ‘आफत’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अक्षरा आणि विजय दोघेही आफत या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. अक्षरा आणि विजय देवरकोंडा यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडल्याचे दिसते असून चाहत्यांनी यांच्या डान्स व्हिडीओला खूप प्रेम दिले असून लाईकचा पाऊस डान्स व्हिडीओवर पडतो आहे.
डान्स व्हिडिओपूर्वी अक्षरा सिंहने विजय देवरकोंडासोबतचा एक फोटो शेअर केला होता. लायगर इव्हेंटमध्ये विजय देवरकोंडाला भेटण्यासाठी अक्षरा खूप उत्सुक होती. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने आपला आनंदही व्यक्त केला आहे. आता त्याने डान्सचा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. विजय देवरकोंडाने लायगर चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलीवूडमध्ये पर्दापण केले आहे. त्याच्या या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडेही महत्वाच्या भूमिकते दिसलीयं.