विकास मालूच्या पत्नीचा गाैप्यस्फोट, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा आणि सतीश कौशिक पार्टीमध्ये सहभागी, सान्वी म्हणाली
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सात तारखेला आयोजित केलेल्या होळी पार्टीमध्ये मुंबईत धमाल करताना सतीश कौशिक दिसले होते. मात्र, नऊ तारखेला त्यांनी जगाचा निरोप घेतला.
मुंबई : सतीश कौशिक यांचे निधन 9 मार्च रोजी झाले. वयाच्या 66 व्या वर्षी जगाचा निरोप हा सतीश कौशिक यांनी घेतला. सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. सलमान खान याने सतीश कौशिक यांच्या आठवणीमध्ये एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. इतकेच नाहीतर सतीश कौशिक यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सलमान खान पोहचला होता, त्यावेळी त्याला आपले अश्रू रोखणे देखील अवघड झाले. सतीश कौशिक यांच्या अत्यसंस्कार वेळी सलमान खान (Salman Khan) आकाशाकडे पाहत आपले अश्रू लपवताना दिसला. यापूर्वी कधीच सलमान खान याला इतके जास्त भावूक झाल्याचे कोणी बघितले नव्हते.
सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट फ्लाॅप जात असताना सतीश कौशिक यांचा तेरे नाम हा चित्रपट सलमान खान याच्यासाठी लकी ठरला. तेंव्हापासूनच या दोघांमध्ये खास मैत्री झाल्याचे सांगितले जाते. सतीश कौशिक आणि अनुपम खेर हे खूप जुने मित्र होते. यांची मैत्री ही तब्बल 45 वर्षांची होती.
सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी अनुपम खेर यांनीच दिली. सोशल मीडियावर एक पोस्ट अनुपम खेर यांनी शेअर केली आणि त्यानंतर बाॅलिवूड विश्वावर शोककळा पसरली. सतीश कौशिक यांच्या अत्यसंस्कारवेळी अनुपम खेर हे ढसाढसा रडताना दिसले. ते एकटक सतीश कौशिक यांच्याकडे बघून रडत होते.
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विकास मालू यांच्या फॉर्म हाऊसमध्ये सतीश कौशिक हे पार्टीसाठी पोहचले होते. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पोलिसांनी फॉर्म हाऊसमध्ये तपास केला असता काही आक्षेपार्ह औषधे सापडली. आता विकास मालू यांची दुसरी पत्नी सान्वी हिने काही गंभीर आरोप केले आहेत.
सान्वी मालू हिने 15 कोटींसाठी विकास मालू याने सतीश कौशिक यांना मारले असावे, असे म्हटले. आता सान्वी मालू हिने अत्यंत गंभीर आरोप केला आहे. सान्वी मालू म्हणाली की, माझे पती विकास मालू यांनी दुबईमध्ये एका खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सतीश कौशिक यांनी देखील हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगाही सहभागी झाला होता.
आता सान्वी मालू हिच्या आरोपांनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सान्वी मालू म्हणाली, 23 आॅगस्ट 2022 मध्ये माझ्या पतीने दुबईमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सतीश कौशिक यांच्यासह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा मुलगा अनस देखील आला होता. दुबईमध्ये सतीश कौशिक यांनी त्यांचे 15 कोटी विकास मालू यांना मागितले होते.