Vikram Gokhale | ‘नटसम्राटा’ला अखेरचा निरोप; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पंचतत्त्वात विलीन
अमिताभ बच्चन यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई : चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात विक्रम गोखले यांनी शेवटचा श्वास घेतला. आपल्या करिअरमध्ये विक्रम गोखले यांनी अनेक भूमिका साकारल्या. विक्रम गोखले यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. अमिताभ बच्चन यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुपम खेर यांनी विक्रम गोखले यांच्यासोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिलाय.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात विक्रम गोखले यांचे निधन झाले. त्यानंतर बालगंर्धव येथे विक्रम गोखले यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. बालगंर्धव परिसरात लोकांनी गर्दी मोठ्या प्रमाणात केली होती.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अनंतात विलीन झाले आहेत. 6 वाजून 16 मिनिटांनी त्यांच्यावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत विक्रम गोखले यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
विक्रम गोखले यांनी हम दिल दे चुके सनम, तुम बिन आणि मिशन मंगल यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला. इतकेच नाही तर त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली.
दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यांच्या पत्नीने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.
हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती काल हेल्थ अपडेटमध्ये देण्यात आली होती. आज त्यांचे निधन झाले. विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.