Vikram Vedha: ऐश्वर्याने हृतिकला दिली मात; ‘विक्रम वेधा’ने ओपनिंग वीकेंडला केली निराशा

हृतिक-सैफचा 'विक्रम वेधा' हिट होणं कठीण?

Vikram Vedha: ऐश्वर्याने हृतिकला दिली मात; 'विक्रम वेधा'ने ओपनिंग वीकेंडला केली निराशा
Hrithik and aishwaryaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 4:22 PM

मुंबई- हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. दोन्ही कलाकारांचा ॲक्शन अवतार आणि हृतिक-सैफची टक्कर पाहण्यासाठी चाहते आतूर होते. मात्र प्रत्यक्षात या चित्रपटाची सुरुवात धीम्या गतीने झाली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 10.50 कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी आणि रविवारी कमाईत वाढ झाली, पण पहिल्या वीकेंडच्या दृष्टीकोनातून पाहता, ‘विक्रम वेधा’च्या कमाईचा आकडा हा अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे.

‘विक्रम वेधा’ हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात विजय सेतुपती आणि आर. माधवन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पुष्कर आणि गायत्री या जोडीनेच तमिळ आणि हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हिंदी चित्रपटाचा बजेट आणखी वाढवला गेला. जवळपास 150 कोटींमध्ये हा चित्रपट बनवला गेल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा

भारतात हा चित्रपट 4 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. हृतिक आणि सैफने या चित्रपटाचं प्रमोशनसुद्धा जोरदार केलं होतं. विशेषकरून हृतिकसाठी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट कमकुवत ठरला. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने 38 कोटींचा गल्ला जमवला आहे.

2012 नंतर हृतिकच्या करिअरमधील हा ओपनिंग वीकेंडला सर्वांत कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. गेल्या दहा वर्षांचा आलेख पाहता, हृतिकच्या ‘मोहेंजोदारो’ने सर्वांत कमी कमाई केली होती. हृतिकच्या करिअरमधील हा सर्वांत फ्लॉप चित्रपट ठरला होता.

गेल्या 10 वर्षांतील हृतिकचे टॉप ओपनिंग वीकेंड कमाईचे चित्रपट-

अग्निपथ (2012)- 67.50 कोटी रुपये क्रिश 3 (2013)- 72.8 कोटी रुपये बँग बँग (2014)- 94.13 कोटी रुपये मोहेंजोदारो (2016)- 30.54 कोटी रुपये काबिल (2017)- 67.46 कोटी रुपये सुपर 30 (2019)- 50.76 कोटी रुपये वॉर (2019)- 166.25 कोटी रुपये विक्रम वेधा (2022)- 38 कोटी रुपये

गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच हृतिकच्या चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंडची कमाई 50 कोटींपेक्षा कमी झाली आहे. असं असलं तरी या चित्रपटातील हृतिकच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक होत आहे. त्याच्या कामगिरीवर चाहते खूश आहेत.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.