‘PS-1’ चित्रपटावर विक्रम वेधा चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केले अत्यंत मोठे विधान, वाचा…
यावर उत्तर देताना दिग्दर्शक म्हणाले की, मुळात म्हणजे या पुस्तकाचे अनेक भाग आहेत. मी हे पुस्तक फार पूर्वी वाचले होते.
मुंबई : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खानचा विक्रम वेधा (Vikram Vedha) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटामध्ये हृतिक रोशनचा धमाका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सैफ अली खानने (Saif Ali Khan) देखील चित्रपटासंदर्भात आपल्या चाहत्यांना माहिती दिलीये. विक्रम वेधा हा चित्रपट 2017 मध्ये तामिळमध्ये हीट ठरला होता. त्याचेच विक्रम वेधा हा चित्रपट रिमेक आहे.
तामिळमध्ये विजय सेतुपती हा या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सैफ अली खान आणि हृतिक रोशन दिल्ली येथे आले होते. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.
PS-1 आणि विक्रम वेधा हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. यावर सैफ आणि हृतिकला प्रश्न विचारण्यात आला. कारण दोन्ही चित्रपटांची स्टोरी एकाच पुस्तकामधून घेतलीये. PS-1 आणि विक्रम वेधा चित्रपटाची स्टोरी एकाच पुस्तकातील आहे.
दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. मग यामुळे चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते? या प्रश्नानंतर हृतिक आणि सैफने चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडे असे बघितले की, याबद्दल त्यांना काहीच माहिती नाहीये.
यावर उत्तर देताना दिग्दर्शक म्हणाले की, मुळात म्हणजे या पुस्तकाचे अनेक भाग आहेत. मी हे पुस्तक फार पूर्वी वाचले होते. मला वाटते की, प्रेक्षकांनी PS-1 आणि विक्रम वेधा हे दोन्ही चित्रपट बघायला पाहिजेत. बघुयात आपण पुढे नेमके काय होते ते… मी स्वत: PS1 हा चित्रपट बघणार आहे.