‘सनक’साठी घेतलेल्या मेहनतीकरिता विपुल शाह यांनी विद्युत जामवालची केली प्रशंसा!

अ‍ॅक्शन दृश्यांचे परिणाम, पद्धती व त्यांच्याकरिता विद्युतच्या सुरु असलेल्या तयारीबदल बोलताना विपुल शाह यांनी प्रचंड कौतुक केलं आहे. (Vipul Shah praises Vidyut Jamwal for his hard work for 'Sanak'!)

'सनक'साठी घेतलेल्या मेहनतीकरिता विपुल शाह यांनी विद्युत जामवालची केली प्रशंसा!
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 5:13 PM

मुंबई : कनिष्क वर्मा दिग्दर्शित सनक- होप अंडर सीज’ (Sanak) हा एक अ‍ॅक्शनने भरलेला एक हॉस्टेज ड्रामा थ्रिलरपट आहे. जगातील सर्वात बड्या अ‍ॅक्शन हिरोंपैकी एक असलेल्या विद्युत जामवाल, बंगाली स्टार रुक्मिीणी मैत्रा, चंदन राय सान्याल आणि नेहा धुपिया यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अ‍ॅक्शनने भरलेल्या ट्रेलरची चाहत्यांसह समीक्षक तसेच संपूर्ण चित्रपटसृष्टी प्रचंड कौतुक करत आहे. खासकरुन या चित्रपटासाठी विद्युतने केलेली तयारी ही कौतुक करण्याजोगी आहे. त्यामुळे विपुल शाह यांना देखील विद्युतची प्रशंसा करण्याचा मोह आवरता आला नाही. विद्युतद्वारे मध्यवर्ती भूमिका सकरण्यासोबतच सनक हा निश्चितपणे भावना, प्रेम, नाट्य यांच्या समान डोससह अ‍ॅक्शनने भरलेला चित्रपट असेल.

अ‍ॅक्शन दृश्यांचे परिणाम, पद्धती व त्यांच्याकरिता विद्युतच्या सुरु असलेल्या तयारीबदल बोलताना विपुल शाह म्हणाले की, “आम्ही एकत्र जे काही चित्रपट केले आहेत त्याकरिता विद्युत नेहमीच वेगळ्या पद्धतीने तयारी करत असतो. त्याच्याकडे अनेक कल्पना असून त्यावर तो सातत्याने काम करत असतात. अगदी तेव्हाही जेव्हा आम्ही शूटींग करत नसतो किंवा तेव्हाही जेव्हा चित्रपटाची काही योजना नसते. तो आपल्या आगामी चित्रपटातील अ‍ॅक्शनला वेगळ्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी नवनवीन कल्पनांवर वर्षभर काम करत असतो.”

विपुल शाह यांंनी पुढे म्हणाले की, “या चित्रपटासाठी आमच्या दोघांचीही अशी इच्छा होती की या चित्रपटातील अ‍ॅक्शन आजवर कधीही हिंदी सिनेमात दाखवण्यात आलेली नसावी. विद्युत ही एक अशी व्यक्ती आहे जी आम्ही जे काही केले किंवा मिळवले त्यावर कधीही संतुष्ट नसते. त्यामुळे आम्ही जेव्हा सनकची योजना आखत होतो तेव्हा तो म्हणाला होता, सर ‘कमांडो’च्या पुढे जायचे आहे व आपण त्याच्या पुढे जाऊ. त्याने अ‍ॅँडी लॉँगच्या (हॉलीवूड स्टंट कोरिओग्राफर) टीमबरोबर सनकसाठी काय काय तयारी केली होती हे जेव्हा मी पाहिले होते तेव्हा मी थक्क झालो. दिग्दर्शक कनिष्क वर्मा यांचा सुंदर आणि स्पष्ट विचार होता की त्यांना स्क्रीनवर अ‍ॅक्शन दृश्ये कशाप्रकारे पाहण्याची इच्छा आहे, त्यामुळे एका टीमच्या रुपात त्यांनी असे काहीतरी बनवले आहे, जे नक्कीच शानदार, आकर्षक आणि वेगळ्या स्तरावरचे झाले आहे. त्यामुळे विपुल नेहमी जे काही समोर आणतो त्यामुळे मी कायम अचंबित होतो.’

विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनीत, ‘सनक – होप अंडर सीज’ झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत असून 15 ऑक्टोबरपासून केवळ डिज्नी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर स्ट्रीम करेल. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Ashrita Shetty : प्रचंड सुंदर आहे ‘या’ क्रिकेटपटूची पत्नी, दक्षिणात्य चित्रपटांमध्ये पाडली अभिनयाची छाप

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात होणार नव्या वाईल्ड कार्ड पाहुण्याची एण्ट्री, पाहा कोण आहे हा अभिनेता?

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...