‘द काश्मीर फाईल्स’च्या (The Kashmir Files) मोठ्या यशानंतर आता दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. विवेक यांनी नुकतंच ट्विटरवर ‘#TheDelhiFiles‘ असा हॅशटॅग लिहिला आहे. त्यामुळे ‘द दिल्ली फाईल्स’ हा त्यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय. विवेक अग्निहोत्री यांनी हे ट्विट करताच त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘तुमच्या या चित्रपटालाही यश मिळो’, असं एकाने लिहिलं. तर ‘सत्य समोर येण्याची आम्ही वाट पाहत आहोत’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘दिल्लीच्या अशा अनंत यातना आहेत, ज्या कव्हर करता येतील,’ असंही एकाने म्हटलंय. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून मांडण्याचा दावा अग्निहोत्रींनी केला. त्यामुळे ‘द दिल्ली फाईल्स’मधून कोणती कथा ते मांडणार याबद्दलचं कुतूहल नेटकऱ्यांमध्ये निर्माण झालं आहे.
‘द काश्मीर फाईल्स बनवण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. गेल्या चार वर्षांपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे मेहनत केली. लोकांना नरसंहार आणि काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय याची जाणीव करून देणं महत्त्वाचं होतं. आता नव्या चित्रपटावर काम करण्याची माझी वेळ झाली आहे’, असं ट्विट अग्निहोत्रींनी केलं.
I thank all the people who owned #TheKashmirFiles. For last 4 yrs we worked very hard with utmost honesty & sincerity. I may have spammed your TL but it’s important to make people aware of the GENOCIDE & injustice done to Kashmiri Hindus.
It’s time for me to work on a new film. pic.twitter.com/ruSdnzRRmP
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 15, 2022
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 15, 2022
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलंच यश मिळालं. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने 250 कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासह इतरही नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत. काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटावर विविध स्तरांतून प्रतिक्रियाही उमटल्या. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं, तर काहींनी त्याविरोधात आपलं मत मांडलं.
हेही वाचा: