Vivek Agnihotri | विवेक अग्निहोत्री यांनी केला मोठा दावा, म्हणाले पठाण चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा…
विवेक अग्निहोत्री यांनी चांगलाच समाचार अनुराग कश्यप यांचा घेतला होता. कायमच सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये वाद सुरू असतो.
मुंबई : बाॅलिवूड चित्रपटसृष्टीतील फेमस दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे कायम चर्चेत राहणारे एक नाव आहे. विषय कोणताही असो विवेक अग्निहोत्री आपले मत मांडल्याशिवाय राहत नाहीत. द कश्मीर फाईल्स या चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्री यांच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झालीये. अनुराग कश्यप यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, पुष्पा आणि कांतारा यासारख्या चित्रपटांमध्ये बाॅलिवूडचे (Bollywood) मोठे नुकसान होत आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी चांगलाच समाचार अनुराग कश्यप यांचा घेतला होता. कायमच सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये वाद सुरू असतो. प्रकाश राज यांनी केरळमधील मातृभूमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ लेटर्समध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटाला बकवास म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी प्रकाश राज यांना खडेबोल सुनावले होते. आता परत एकदा विवेक अग्निहोत्री हे चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी पठाण चित्रपटाबद्दल मोठे विधान केले आहे.
शाहरुख खान याचा पठाण चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता विवेक अग्निहोत्री यांनी मोठे विधान केले आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री यांना शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, पठाण चित्रपटाचे सर्व श्रेय हे शाहरुख खान याला जाते…ज्यापध्दतीने शाहरुख खान याने चित्रपटाचे सर्व नियोजन आणि मार्केटिंग केली ते सर्व काैतुकास्पद नक्कीच आहे.
एक प्रकारे शाहरुख खान याने दाखवून दिले की, हा चित्रपट माझा आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी देखील माझी आहे. त्यामुळेच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे.
पुढे विवेक अग्निहोत्री म्हणाले, दुसरीकडे पठाण चित्रपटाचे श्रेय हे बॉलिवूडच्या बॉयकॉट ट्रेंडलाही जाते. कारण त्यांनी चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियावर पठाण चित्रपटाच्या विरोधात बॉयकॉट ट्रेंड सुरू केला होता.
बॉयकॉट ट्रेंडमुळे नकारात्मक काहीच झाले नाही आणि बॉयकॉट टोळीचा डाव उलटा पडला. उलट या ट्रेंडचा फायदा प्रत्यक्षात चित्रपटाला झाला. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला आता रिलीज होऊन तब्बल तीन आठवडे झाले आहेत.
अजूनही बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची जादू बघायला मिळत आहे. फक्त साऊथमध्ये या चित्रपटाला अपेक्षित कामगिरी करण्यात यश मिळाले नाहीये. विदेशातही चित्रपटाला प्रचंड प्रेम मिळताना दिसत आहे.