Kaali: ‘काली’ पोस्टरच्या वादात विवेक अग्निहोत्रींची उडी; लीना मणिमेकलाई यांना म्हणाले ‘पागल’
लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या 'काली' (Kaali) या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून वाद सुरू आहे. या पोस्टरमुळे लीना मणिमेकलाई या वादात अडकल्या आहेत. आता 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीसुद्धा या वादात उडी घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या ‘काली’ (Kaali) या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून वाद सुरू आहे. या पोस्टरमुळे लीना मणिमेकलाई या वादात अडकल्या आहेत. आता ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीसुद्धा या वादात उडी घेतली आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी लीना मणिमेकलाई यांना ‘वेडी’ असं म्हटलंय. ‘काली’च्या पोस्टरवरील वादप्रकरणी लीना यांच्या विरोधात अनेक एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आले आहेत. तर दिल्ली न्यायालयाने त्यांना 6 ऑगस्ट रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. या सर्व घडामोडींदरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत लीना मणिमेकलाई यांना टोला लगावला आहे.
कालीच्या वादग्रस्त पोस्टरच्या समर्थनार्थ लीना यांनी काही विधान केले होते. याच विधानांवर प्रतिक्रिया देताना अग्निहोत्री यांनी टोमणा मारला. ‘माझी काली ही डॉक्युमेंट्री अनोख्या विषयावर आहे. ती एक मुक्त आत्मा आहे. ती पितृसत्ताक समाजावर भाष्य करते तर हिंदुत्वाला मोडून काढते. ती भांडवलशाही नष्ट करते आणि प्रत्येकाला तिच्या हजार हातांनी आलिंगन देते,’ असं लीना म्हणाल्या होत्या. त्यावर टीका करत अग्निहोत्री म्हणाले, ‘कोणी अशा वेड्या लोकांना संपवू शकेल का?’
विवेक अग्निहोत्री यांचं ट्विट-
? ? ? ? ? ? ? ? ? ? Can someone dismantle such crazy wokes? Please. https://t.co/Xee5nwOEwX
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 11, 2022
लीना मणिमेकलाई यांच्या ट्विटला रिट्विट करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं, ‘या वेड्यांना कोणी संपवू शकेल का? प्लीज’. अग्निहोत्रींच्या आधी भजनसम्राट अनुप जलोटा यांनीसुद्धा लीना मणिमेकलाई यांनी वेडं म्हटलं होतं. ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अनूप जलोटा म्हणाले होते की, “लीना मनिमेकलाई यांना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवलं पाहिजे. स्वस्तात लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांनी हे सर्व केलंय. अशी कृत्यं फक्त वेडेच करतात. भविष्यातही ते असंच काहीतरी करत राहतील. म्हणूनच अशा लोकांना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवणं आवश्यक आहे.”
लीना यांच्या ‘काली’ या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये देवी कालीच्या वेशातील अभिनेत्रीच्या हातात सिगारेट आणि LGBTचा झेंडा दाखवण्यात आला होता. बऱ्याच वादानंतर ट्विटरने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ही पोस्ट हटवली होती.