Wedding Anniversary | लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासाठी लिहिला खास मेसेज, पोस्ट चर्चेत!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा राज कुंद्रा (Raj Kundra) यांना गेल्या काही महिन्यांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. राजच्या अटकेनंतर त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले.

Wedding Anniversary | लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासाठी लिहिला खास मेसेज, पोस्ट चर्चेत!
Raj-Shilpa
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 11:06 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा राज कुंद्रा (Raj Kundra) यांना गेल्या काही महिन्यांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. राजच्या अटकेनंतर त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर अशाही बातम्या आल्या की, शिल्पा राजवर नाराज आहे आणि त्यांच्या नात्यात मतभेत निर्माण झाले आहेत. मात्र, हे सर्व वृत्त चुकीचे असल्याचे सांगत शिल्पाने राजसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

खरंतर आज (22 नोव्हेंबर) शिल्पा आणि राजच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने शिल्पाने राजसाठी खास पोस्ट लिहिली आहे. तिने राजसोबतच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत शिल्पाने लिहिले की, ’12 वर्षांपूर्वीचा हा क्षण. आम्ही एकमेकांना वचन दिले की, आम्ही चांगल्या आणि वाईट वेळी कायम एकत्र राहू. आजही आम्ही हे वचन पूर्ण करत आहोत. आपण प्रेमावर विश्वास ठेवला, तर देव आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवतो. 12 वर्षे आणि आणखी पुढे….लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कुकी…’

पाहा पोस्ट :

राज कुंद्राचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न!

या फोटोंमध्ये शिल्पाने लाल सिल्कची भरजरी साडी आणि भारी दागिने परिधान केलेले दिसतील. दुसरीकडे, राजने शिल्पाच्या आउटफिटसोबत मॅचिंग शेरवानी आणि सेहरा परिधान केला आहे. दोघेही लग्नाचे विधी करताना दिसत आहेत. या सगळ्या फोटोंमध्ये राज कुंद्राचा चेहरा मात्र झाकलेला आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यापासून राज कुंद्रा लाइमलाईटपासून दूर आहे. तो पूर्वीसारखा शिल्पासोबत आऊटिंगला दिसत नाही. यासोबतच त्याने त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले आहेत. काही दिवसांपासून तो आपले खासगी आयुष्य एकांतात जगत आहे.

शिल्पासोबत मंदिराला दिली भेट

काही दिवसांपूर्वी राज कुंद्राने शिल्पासोबत हिमाचलला जाऊन तेथील अनेक मंदिरांना भेट दिली. यावेळी दोघांनी एकमेकांचा हात धरलेले दिसले. याशिवाय दोघांनीही पिवळ्या रंगाचे आउटफिट परिधान केले होते. शिल्पाने पिवळ्या रंगाचा सूट घातला होता, तर राजने पिवळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

यापूर्वी राज तुरुंगात असताना शिल्पा त्याच्यासाठी वैष्णोदेवी येथे प्रार्थना करण्यासाठी गेली होती. काही दिवसांनी राज तुरुंगातून बाहेर आला. काहीही झाले, तरी शिल्पाने राजला पूर्ण पाठिंबा दिला आहे. प्रत्येक संकटात ती राजच्या पाठीशी उभी राहिली आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Kartik Aaryan | ‘धमाका बॉय’ कार्तिक आर्यनने फॅन्ससोबत साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो…

Devmanus 2 | तो परत येतोय, ‘देवमाणूस 2’ मालिकेचा उत्कंठावर्धक प्रोमो, डॉ. अजितकुमार पुन्हा भेटीला

TMKOC | आणि जेव्हा परीकथा खरोखरच सत्यात उतरतात, मुलाच्या उपस्थितीत ‘तारक मेहता…’च्या ‘रीटा रिपोर्टर’ने केले दुसरं लग्न

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.