Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sidharth Kiara Wedding | कियारा अडवाणी जैसलमेरकडे रवाना, शाही विवाह सोहळ्यास सुरूवात

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी याच्या लग्नाचे कार्यक्रम आजपासून सुरू होणार आहेत. आज कियारा अडवाणी ही कुटुंबियांसोबत मुंबईमधून जैसलमेरकडे रवाना झालीये.

Sidharth Kiara Wedding | कियारा अडवाणी जैसलमेरकडे रवाना, शाही विवाह सोहळ्यास सुरूवात
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 5:55 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani)  हे लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांचा विवाहसोहळा अत्यंत शाही पध्दतीने ६ फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडणार आहे. हा विवाहसोहळा (Wedding) खासगी असणार असून १०० ते १५० लोक या विवाहसोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. आता लग्नाची पूर्ण तयारी जवळपास झालीये. सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा दिल्लीमध्ये असून तो आपल्या कुटुंबियांसोबत आज जैसलमेरकडे रवाना होऊ शकतो. गेल्या कित्येक दिवसांपासून सतत चर्चा होत्या की, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अकियारा अडवाणी हे एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे सोबत स्पाॅट देखील व्हायचे. चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी आता ६ फेब्रुवारीला हे दोघे लग्नबंधणात अडकणार आहेत. अमिताभ बच्चन, शाहिद कपूर, अक्षय कुमार यासारख्या काही स्टारला लग्नाचे निमंत्रण देण्यात आलंय.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी याच्या लग्नाचे कार्यक्रम आजपासून सुरू होणार आहेत. आज कियारा अडवाणी ही कुटुंबियांसोबत मुंबईमधून जैसलमेरकडे रवाना झालीये. यावेळी कियारा अडवाणी हिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच छान ग्लो बघायला मिळाला.

सिद्धार्थ मल्होत्रा हा देखील आज कुटुंबियांसोबत दिल्लीहून जैसलमेरकडे जाईल. हा विवाहसोहळा अत्यंत खासगी पध्दतीने पार पडणार असल्याने विवाहसोहळ्यातील फोटो स्वत: कियारा किंवा सिद्धार्थ मल्होत्रा चाहत्यांसाठी शेअर करतील.

सिद्धार्थ मल्होत्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत होता. नुकताच सिद्धार्थ मल्होत्रा याचा मिशन मजनू हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा हा एका रॉ एजंटच्या भूमिकेत आहे.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा याचा त्याच्या लग्नाविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला की, हो माझे सर्व गोष्टींवर लक्ष आहे. परंतू मलाच अजून कोणी लग्नाला बोलावले नाहीये. लोकांनी माझ्या पर्सनल लाईफवर लक्ष देण्यापेक्षा माझ्या चित्रपटांवर अधिक लक्ष द्यावे.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.