काय बोलता! अभिनेत्रीला पॉकेटमारी प्रकरणी अटक, कोणत्या अभिनेत्रीनं केला चोरीचा प्रताप?, काय आहे नेमकं प्रकरण?
कोलकाता पुस्तक मेळाव्यात बंगालमधील चित्रपट अभिनेत्री रुपा दत्ताला पॉकेटमारीच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या अटकेनंतर पोलिसांनाच आश्चर्य वाटतंय की असं काय कारण आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला पॉकेटमारी करावी लागतेय. याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या (west bangal) राजधानीत एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. साल्टलेकमध्ये चालू असलेल्या कोलकाता (kolkata) पुस्तक मेळाव्याच्या परिसरात पॉकेटमारी करण्याच्या आरोपांखाली एका महिलेला अटक करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या माहिलेचं नाव रुपा दत्ता असं आहे. तीला बिधाननगर उत्तर ठाणा पोलिसांनी (Police) अटक केली आहे. चौकशीअंती पोलिसांना अशी माहिती मिळाली की अटकेत असलेली महिला ही बंगालच्या चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री (actress) आहे. अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांना आश्चर्य वाटलं. पोलिसांकडून आता चौकशी सुरु आहे. अभिनेत्री रुपा दत्ताला पुस्तक मेळाव्यात पॉकेटमारी का करावी लागली, याचा पोलीस तपास करतायेत.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथे सुरू असलेल्या पुस्तक मेळाव्यात पोलिसांनी एका महिलेला कचऱ्यात बॅग फेकताना पाहिलं. यावेळी पोलिसांनी त्या महिलेला विचारलं की तुम्ही ही बॅग इथे का फेकून जाताय? पोलिसांच्या या प्रश्नावर त्या महिलेला उत्तरच देता आलं नाही. त्यानंतर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी चौकशी सुरु केली. यानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्यानं देखील या महिलेच्या बॅगची तपासणी केली. तपासनीनंतर या महिलेच्या बॅगमध्ये अनेक पर्स सापडून आल्यात. त्यानंतर या महिलेनं मान्य केलं की ती मोठ्या मेळाव्यांमध्ये पॉकेटमारी करते. शनिवारी या महिलेच्या बॅगमधून 75 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
अभिनेत्री का करते चारी?
चोरी करणारी महिला अभिनेत्री असल्याचं लक्षात येताच पोलीस दंग झाले. बंगाली अभिनेत्री रुपा दत्तानं अनेक चित्रपटात काम केलंय. तीनं अनेक मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्रीकडून एक डायरी हस्तगत करण्यात आली. ज्यामध्ये तीनं कुठे पॉकेटमारी केली याचा हिशेब लिहिलाय. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जातेय. पोलिसांना संशय आहे की रुपा दत्ता ही एका मोठ्या चोरी करणाऱ्या टोळीची सदस्य आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून या चोरी करणाऱ्या अभिनेत्रीला न्यायालयासमोर उभं करुन पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलंय.
इतर बातम्या