मी त्या देशातून येतो, जिथं दिवसा बायकांची पूजा केली जाते आणि रात्री रेप, वीर दासचा व्हिडीओ भडकाऊ की वास्तव?

कॉमेडियन वीर दासच्या (Vir Das) एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. काही लोक त्याला समर्थन देत आहेत, तर काही त्याच्या विरोधात प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्याविरोधात दिल्ली आणि मुंबईतील पोलिस ठाण्यातही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मी त्या देशातून येतो, जिथं दिवसा बायकांची पूजा केली जाते आणि रात्री रेप, वीर दासचा व्हिडीओ भडकाऊ की वास्तव?
Vir Das
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 4:23 PM

मुंबई : कॉमेडियन वीर दासच्या (Vir Das) एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. काही लोक त्याला समर्थन देत आहेत, तर काही त्याच्या विरोधात प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्याविरोधात दिल्ली आणि मुंबईतील पोलिस ठाण्यातही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

वीर दास याने सोमवारी त्याच्या यूट्यूब चॅनलवर 6 मिनिटांचा एक व्हिडीओ शेअर केला. वॉशिंग्टन डी.सी.मधील जॉन एफ. केनेडी सेंटरमधील अमेरिकेतील त्याच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. यामध्ये वीर दासने एकव स्वरचित कविता वाचून दाखवली, ज्याचे शीर्षक होते – ‘I come from two Indias’ म्हणजेच ‘मी दोन भारतातून आलोय.’

कुठे कौतुक, तर कुठे टीका

व्हिडीओमध्ये त्याने भारतातील विरोधाभास लोकांसमोर मांडला आहे. हा व्हिडीओ समोर येताच अवघ्या काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांनी अवघ्या इंटरनेटविश्वाला देखील दोन गटात विभागले. या गोष्टी उघडपणे बोलल्याबद्दल अनेक लोक वीर दासचे कौतुक करत आहेत, तर अनेक लोक त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप करत आहेत.

गुन्हाही दाखल

आशुतोष दुबे नावाच्या व्यक्तीने वीरदास यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. यामध्ये त्यांनी वीरदासने भारताविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्याचे म्हटले आहे. त्याने अशी विधाने केली आहेत, ज्यामुळे भारताची लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप केला आहे.

वीर दासविरोधात दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. अमेरिकेत आयोजित एका कार्यक्रमात कॉमेडियनने देशाविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप आदित्य झा नावाच्या एका व्यक्तीने केला आहे.

नेमकं काय म्हटलंय ‘या’ व्हिडीओमध्ये?

मी अशा भारतातून आलो आहे, जिथे मुलं मास्क घालून एकमेकांचा हात धरतात, पण नेते मास्कशिवाय एकमेकांना मिठी मारतात.

मी अशा भारतातून आलो आहे, जिथे AQI 9000 आहे, पण तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे पाहतो.

मी एका अशा भारतातून आलो आहे, जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री सामूहिक बलात्कार होतो.

मी अशा भारतातून आलो आहे, जिथे बॉलीवूडबद्दल लोक ट्विटरवर विभागलेले आहेत, पण रंगभूमी अंधारात आहे.

मी अशा भारतातून आलो आहे, जिथे पत्रकारिता संपली आहे, पुरुष पत्रकार एकमेकांचे कौतुक करत आहेत आणि महिला पत्रकार लॅपटॉप घेऊन रस्त्यावर बसून सत्य सांगत आहेत.

मी एका अशा भारतातून आलो आहे, जिथे तुम्हाला आमच्या घराच्या भिंतीबाहेरही आमचे हास्य ऐकू येते आणि अशाही भारतातून आलो आहे, जिथे आतून हशा ऐकू आल्यावर कॉमेडी क्लबच्या भिंती तुटतात.

मी अशा भारतातून आलो आहे, जिथे 30 वर्षांपेक्षा कमी वयाची लोकसंख्या अधिक आहे, पण आपण 75 वर्षांच्या नेत्यांच्या 150 वर्षांच्या जुन्या कल्पना ऐकणे कधीच थांबत नाही.

मी अशा भारतातून आलो आहे, जिथे आम्हाला PM शी संबंधित प्रत्येक माहिती दिली जाते पण PMCares बद्दल कोणतीही माहिती मिळत नाही.

मी अशा भारतातून आलो आहे, जिथे स्त्रिया साड्या आणि स्नीकर्स घालतात आणि तरीही त्यांना एका वृद्ध माणसाचा सल्ला घ्यावा लागतो, ज्याने आयुष्यभर साडी नेसलेली नाही.

मी त्या भारतातून आलो आहे, जिथे शाकाहारी असण्याचा अभिमान बाळगला जातो, पण जे शेतकरी या भाज्या पिकवतात त्याच शेतकऱ्यांना चिरडून टाकले जाते.

मी त्या भारतातून आलो आहे, जिथे आम्ही सैनिकांना पूर्ण पाठिंबा देतो, जोपर्यंत त्यांच्या पेन्शनबद्दल बोलले जात नाही.

मी त्या भारतातून आलो आहे, जो गप्प बसणार नाही, मी त्या भारतातून आलो आहे जो बोलणारही नाही.

मी अशा भारतातून आलो आहे जे वाईट गोष्टीं बोलण्याबद्दल शाप देतात, मी भारतातून आलो आहे, जे लोक त्यांच्या कमतरतांबद्दल उघडपणे बोलतात.

मी त्या भारतातून आलो आहे, हे पाहून कोण म्हणेल ‘ही कॉमेडी नाही.. विनोद कुठे आहे?’ आणि मी त्या भारतातूनच आलो आहे, ज्यात हे बघून समजेल की हा विनोद आहे. फक्त मजेदार नाही.

पाहा व्हिडीओ :

नेमका आक्षेप कशावर?

या कविता सादरीकरणानंतर वीर दासवर टीका देखील होतेय, तर काही त्याचे कौतुक देखील करतायत. मात्र, या कवितेतील विरोधाभास काहींना रुचलेला नाही. तर, दुसरं कारण म्हणजे वीर दासने ही कविता अमेरिकेतील एका क्लबमध्ये सादर केली आहे. अर्थात त्याने परदेशात जाऊन स्वदेशाचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे.

हेही वाचा :

Chhorii Trailer Release | ‘लपाछपी’चा हिंदी रिमेक, नुसरत भरुचा अभिनित भयपट ‘छोरी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Ranveer-Deepika Wedding Anniversary | ‘रब ने बनादी जोडी’, रोमँटिक अंदाजात रणवीर-दीपिकाने साजरा केला लग्नाचा वाढदिवस!

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....