Throwback | …जेव्हा अभिषेक-ऐश्वर्याची लाडकी लेक आराध्या दुसऱ्याच अभिनेत्याला आपला ‘बाबा’ समजते!
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की 'ऐ दिल है मुश्किल'च्या शूटिंग दरम्यान तिची मुलगी आराध्याने अभिषेक बच्चन समजून अभिनेता रणबीर कपूरला मिठी मारली होती.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात दोघांमधील केमिस्ट्रीला चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटात ऐश्वर्या आणि रणबीरच्या रोमान्सची खूप चर्चा झाली होती. पण तुम्हाला माहिती आहे काय की, ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्याने या चित्रपटाच्या सेट्सवर रणबीरला आपले वडील समजली होती.
स्वतः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की ‘ऐ दिल है मुश्किल’च्या शूटिंग दरम्यान तिची मुलगी आराध्याने अभिषेक बच्चन समजून अभिनेता रणबीर कपूरला मिठी मारली होती. आराध्या चुकून रणबीरलाचा आपला ‘बाबा’ समजली होती.
नेमकं काय झालं?
वास्तविक त्या दिवशी रणबीर कपूर याने अभिषेक बच्चनसारखा पोशाख परिधान केला होता आणि यामुळे आराध्याचा गैरसमज झाला. आराध्याला तिची चूक समजताच ती खूप लाजली. ऐश्वर्या राय याबद्दल सांगताना म्हणाली होती की, जेव्हा मी तिला विचारले की तुला तो तुझा बाबा वाटला होता का? ज्यावर आराध्याने होकारार्थी उत्तर दिले होते.
अभिषेकची प्रतिक्रिया
त्याचवेळी यावर अभिषेक बच्चनची प्रतिक्रियाही खूप मजेदार होती. त्याने रणबीरला छेडले आणि म्हणाला, ‘हम्म …तो क्रश आहे.’ विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. अनेकदा ऐश्वर्या राय-बच्चन सोशल मीडियावर आपल्या मुलीची छायाचित्रे पोस्ट करत असते, यावर चाहते भरभरून लाईक्स करत असतात.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे 2007 मध्ये लग्न झाले होते. यादरम्यान या दोघांच्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. आराध्याचा जन्म 2011मध्ये झाला होता आणि आता ती नऊ वर्षांची आहे. चित्रपटांविषयी बोलताना ऐश्वर्या शेवटच्या वेळी ‘फन्ने खान’ चित्रपटात दिसली होती.
ऐश्वर्याकडे पुन्हा ‘गुडन्यूज’ची चर्चा!
सध्या ऐश्वर्याचे काही फोटो चर्चेत आहेत. या फोटोत ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांच्यासोबत दिसत आहेत. हे फोटो पाहून चाहते बुचकळ्यात पडले आहेत. या सर्व फोटोंमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे वजन खूप वाढलेय असे वाटतेय, एवढेच नव्हे तर तिने सर्व फोटोंमध्ये आपले पोट लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ऐश्वर्याकडे पुन्हा ‘गुडन्यूज’ची चर्चा रंगली आहे.
(When Aardhya Bachchan hugged Ranbir Kapoor thinking as her father abhishek bachchan)