Aishwarya Rai: न्यूडिटीबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला ऐश्वर्याचं सडेतोड उत्तर; पत्रकाराची केली स्त्रीरोगतज्ज्ञाशी तुलना

ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तिच्या या उत्तराचं कौतुक केलं. 'ऐश्वर्याने मुलाखती देणं का बंद केलं हे मला आता समजलं', असं एकाने म्हटलं. तर 'ऐश्वर्याने आधी तशा पद्धतीचं काम केलं असतं तर असा प्रश्न विचारण्याची गोष्ट वेगळी असती. पण काहीच संबंध नसताना तिला असा का प्रश्न का विचारला', असं दुसऱ्याने युजरने म्हटलं.

Aishwarya Rai: न्यूडिटीबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला ऐश्वर्याचं सडेतोड उत्तर; पत्रकाराची केली स्त्रीरोगतज्ज्ञाशी तुलना
Aishwarya RaiImage Credit source: AP
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 8:28 AM

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) लवकरच दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटातून पुनरागमन करतेय. ऐश्वर्याच्या सौंदर्याची चर्चा तर नेहमीच सोशल मीडियावर होत असते. मात्र सध्या तिचा एक जुना मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तिने पत्रकाराला दिलेल्या उत्तराची चर्चा होत आहे. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाशी कम्फर्टेबल नसल्याने ऐश्वर्याने सडेतोड उत्तर देत त्यांचं तोंड बंद केलं. परदेशातील एका फ्रेंच पत्रकाराने ऐश्वर्याची ही मुलाखती घेतली होती. या मुलाखतीत त्याने तिला पडद्यावरील न्यूडिटीबद्दल (nudity) प्रश्न विचारला होता. “मला पत्रकाराशी नव्हे तर स्त्रीरोगतज्ज्ञाशी बोलल्यासारखं वाटत आहे”, असं ऐश्वर्या म्हणाली. जवळपास दहा वर्षांपूर्वींची ही मुलाखत आहे.

ऐश्वर्याची ही जुनी मुलाखती पुन्हा रेडिटवर शेअर केल्याने चर्चेत आली आहे. ऑनस्क्रीन न्युडिटीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ऐश्वर्या आधी म्हणाली, “मी कधीच तशा पद्धतीचं काम केलं नाही आणि मला भविष्यातही न्युडिटीमध्ये काहीच रस नाही.” या तिच्या उत्तरानंतरही पत्रकाराने तिला न्युडिटीबद्दल पुन्हा विचारलं. तेव्हा वैतागून ऐश्वर्या म्हणाली, “मला असं वाटतंय की मी एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञाशी बोलतेय. मी नक्की कोणाशी बोलतेय? तुम्ही पत्रकार आहात भाऊ, त्याच अनुषंगाने प्रश्न विचारा.”

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तिच्या या उत्तराचं कौतुक केलं. ‘ऐश्वर्याने मुलाखती देणं का बंद केलं हे मला आता समजलं’, असं एकाने म्हटलं. तर ‘ऐश्वर्याने आधी तशा पद्धतीचं काम केलं असतं तर असा प्रश्न विचारण्याची गोष्ट वेगळी असती. पण काहीच संबंध नसताना तिला असा का प्रश्न का विचारला’, असं दुसऱ्याने युजरने म्हटलं. काहींनी यावरून हॉलिवूडरही टीका केली.

ऐश्वर्या 2018 मध्ये ‘फन्ने खान’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्यासोबत भूमिका साकारली होती. आता ती मणिरत्नम यांच्या बिग बजेट चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिका साकारणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.