विवाहित आदित्य पांचोलीच्या प्रेमात पडली होती कंगना रनौत, मारहाणीच्या घटनेनंतर तुटलं नातं!

अभिनेत्री स्ट्रगल करत असताना कंगना रनौत आणि आदित्य पंचोली यांची भेट झाली. कंगना आणि आदित्य यांची भेट झाली आणि तेव्हाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आदित्य कंगनापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता.

विवाहित आदित्य पांचोलीच्या प्रेमात पडली होती कंगना रनौत, मारहाणीच्या घटनेनंतर तुटलं नातं!
कंगना रनौत - आदित्य पांचोली
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 8:21 AM

मुंबई : चित्रपटसृष्टीने आपल्या पोटात अनेक सिक्रेट्स दडवून ठेवली आहेत. येथे जितक्या लवकर नाती तयार होतात, तितक्या लवकर ती तुटतात. बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी येथे एकमेकांशी नावे जोडले जाणे खूप सामान्य आहे. बर्‍याच वेळा हे संबंध कलाकारांच्या आयुष्यात अक्षरशः भूकंप आणतात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. अभिनेता आदित्य पंचोली (Aditya Pancholi) आणि अभिनेता कंगना रनौत (Kangana Ranaut) यांचे नाते देखील असेच काहीसे होते (When Kangana Ranaut had fallen in love with married Aditya Pancholi know the breakup reason).

अभिनेत्री स्ट्रगल करत असताना कंगना रनौत आणि आदित्य पंचोली यांची भेट झाली. कंगना आणि आदित्य यांची भेट झाली आणि तेव्हाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आदित्य कंगनापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता. प्रेमात पडल्यानंतर कंगना आणि आदित्य लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यावेळी आदित्यचे लग्न झालेले होते आणि त्याला मुलेही होती.

कंगनाला मिळालं बॉलिवूडमध्ये काम

संघर्ष करत असताना कंगनाला तिच्या पहिल्या ‘गँगस्टर’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. ज्यानंतर कंगनाने हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवला. ‘गँगस्टर’नंतर कंगनाला अनेक चित्रपटांची ऑफर देण्यात आल्या होत्या. आदित्य आणि कंगना यांच्यात काही वर्षे सर्व काही ठीक होते, पण नंतर खूप समस्या येऊ लागल्या.

मारहाणीपर्यंत पोहोचले प्रकरण

कंगना आणि आदित्य यांच्या नात्यात अशी एक वेळ आली, जेव्हा या नात्याची परिस्थिती खूप वाईट झाली होती आणि ही गोष्ट मारहाणीपर्यंत गेली होती. वडिलांच्या वयाच्या आदित्यने तिच्यावर हात उगारला असल्याचे कंगनाने एका मुलाखतीत सांगितले होते. त्याने कंगनाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला होता, पण शांत बसेल ती कंगना काय… प्रतिउत्तर देत कंगनाने देखील आदित्यच्या डोक्यावरही चप्पल फेकून मारली.

तुटले संबंध

आदित्य आणि कंगना यांच्यात झालेल्या हाणामारीच्या बातम्यांमुळे ते चर्चेचा एक भाग बनले होते. त्यानंतर दोघेही वेगळे झाले. कंगनाने आदित्यवर प्राणघातक हल्ला, कौटुंबिक हिंसाचारासह अनेक आरोप केले होते. ज्यानंतर या दोघांनी आपले नाते तोडले आणि कायमचे विभक्त झाले. मात्र. आदित्यने कंगनाच्या सर्व आरोपांना निराधार म्हटले होते.

पत्नीबरोबर सुखी आयुष्य जगतो अभिनेता

आदित्य पंचोली कंगनाशी ब्रेकअप करुन पत्नी झरीनाकडे परत आला होता. झरीनाने आदित्य आणि त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचे ठरवले होते. आता आदित्य पत्नी आणि कुटुंबासमवेत आनंदाने राहत आहे. त्याचवेळी आदित्य पंचोलीनंतर कंगना रनौतचे नाव हृतिक रोशन आणि अध्ययन सुमन यांच्याशी जोडले गेले होते.

(When Kangana Ranaut had fallen in love with married Aditya Pancholi know the breakup reason)

हेही वाचा :

Aai Kuthe Kay Karte | मालिकेत पुन्हा एकदा अनघाची एंट्री, अंकिताचा बनाव देशमुख कुटुंबासमोर उघड होणार!

Hungama 2 | ‘जो तकलीफ देनी थी आपने दे दी’, ‘हंगामा 2’च्या ट्रेलर रिलीजनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर!

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.