जेव्हा रडणाऱ्या अमिताभ बच्चन यांना मेहमूद प्रोत्साहन देतात… वाचा ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटाचा मजेशीर किस्सा!

मेहमूद यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत तब्बल 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते, ज्यात बरेच चित्रपट सुपरहिट ठरले होते. मेहमूद यांच्या दमदार आणि संस्मरणीय चित्रपटांमध्ये 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटाचा देखील समावेश आहे.

जेव्हा रडणाऱ्या अमिताभ बच्चन यांना मेहमूद प्रोत्साहन देतात... वाचा 'बॉम्बे टू गोवा' चित्रपटाचा मजेशीर किस्सा!
Mehmood-Amitabh
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 9:38 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते मेहमूद (Mehmood) गंभीर भूमिकांमध्ये देखील असायचे, परंतु ते आपल्या विनोदी चित्रपटांमुळे अधिक लोकप्रिय झाले. मेहमूद यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 रोजी मुंबई येथे झाला होता. मेहमूद यांचे वडील मुमताज अली हे एक स्टेज आर्टिस्ट होते, जे 40 आणि 50च्या दशकात खूप प्रसिद्ध होते. अभिनयाचे गुण वडिलांकडून मेहमूद यांना वारसा रुपी मिळालेले आहेत.

मेहमूद यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत तब्बल 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते, ज्यात बरेच चित्रपट सुपरहिट ठरले होते. मेहमूद यांच्या दमदार आणि संस्मरणीय चित्रपटांमध्ये ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे. आज आपण त्यांच्या याच चित्रपटाशी संबंधित एक मजेदार किस्सा जाणून घेणार आहोत…

‘बॉम्बे टू गोवा’च्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांना कोसळले रडू?

सोनी टीव्हीवर शेखर सुमनचा एक शो असायचा, ज्याचे नाव ‘मूव्हर्स अँड शेकर्स’ होते. मेहमूद एकदा या कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित होते. यादरम्यान मेहमूद यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ (Bombay to Goa)चित्रपटाचा प्रवास, त्यांनी बसमध्ये शूटिंग कशी केली आणि शूटिंग दरम्यान काय घडले ते सांगितले. मेहमूद म्हणाले होते की, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्हाला खूप मजा आली. आम्ही मुंबईहून गोव्याला निघालो होतो.

या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘देखा न हाए रे सोचा न’शी संबंधित किस्सा शेअर करताना मेहमूद म्हणाले की, ‘अमिताभ बच्चन या गाण्यावर नाचू शकले नाहीत. आम्ही मद्रासला गेलो, जिथे बसच्या आत गाण्याचे चित्रीकरण होणार होते. जेव्हा मी सेटवर गेलो तेव्हा मला सांगण्यात आले की, अमिताभ यांना 102-103 ताप आला आहे आणि ते खोलीत गेले आहेत. मी त्यांना (अमिताभ बच्चन) भेटायला गेलो होतो तेव्हा रडत होते. ते म्हणाले की, मी नाचणार नाही. मास्टर जे सांगत आहेत ते माझ्याच्याने होणार नाही. मी ते करू शकत नाहीय.’

मेहमूद यांचा सल्ला उपयोगी पडला!

मेहमूद पुढे म्हणाले, ‘ हे ऐकून मी त्याला सांगितले की, जो माणूस चालू शकतो, तो नाचू देखील शकतो. माझ्या मते तुम्ही आज आराम करा आणि उद्या या. बघ, उद्या इंशाल्लाह सर्व काही फर्स्ट क्लास असेल. यानंतर मी माझ्या मास्टरला सांगितले की, बघ, उद्या यांचा पहिला शॉट घे आणि शॉट खराब असेल तरीही बसमधील सर्व लोकांनी जोरात टाळ्या वाजवायला सांग. नंतर पुढे जा आणि  दुसरा शॉट घे, पुन्हा रिटेक घेऊ नको. कारण एखाद्या अभिनेत्यासाठी त्याचे कौतुक खूप महत्त्वाचे असते.’

ते पुढे म्हणाले, ‘आम्ही सर्वांना समजावून सांगितले होते. आता ते (अमिताभ बच्चन) मेक-अप रूममधून बाहेर आले. मला कुराण शरीफ वाचण्याची सवय आहे. कुराण शरीफ वाचल्यानंतर मी त्यांच्यावर थोडाशी फुंकर देखील मारली. त्यानंतर ते आत गेले आणि एक शॉट दिला. तो अतिशय वाईट शॉट होता, परंतु लोक जोरात टाळ्या वाजवत होते. आता गाणे पुढे गेले आणि मग ज्या मूडमध्ये लंबू (अमिताभ बच्चन) आला, त्याने असे धडाकेबाज नृत्य केले. पहिल्यांदा जो खराब शॉट देण्यात आला, तो नंतर शेवटी जोडला गेला. आणि त्यानंतर नृत्यात अमिताभ यांनी मागे वळून पहिलेच नाही.’ मेहमूदचा हा चित्रपट सुपरहिट असल्याचे सिद्ध झाले आणि ‘किंग ऑफ कॉमेडी’ने अमिताभ बच्चन यांना या चित्रपटाद्वारे पहिला व्यावसायिक ब्रेक दिला.

(When Mehmood encourages the crying Amitabh Bachchan Read the funny incident from the movie ‘Bombay to Goa’)

हेही वाचा :

Hungama 2 | ‘हंगामा 2’द्वारे तब्बल 8 वर्षानंतर प्रियदर्शन यांचं कमबॅक, एक नजर त्यांच्या सुपरहिट विनोदी चित्रपटांवर!

Madhuri Dixit Net Worth | बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण! जाणून घ्या नेटवर्थ किती…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.