अमिताभ बच्चनपेक्षाही अधिक मानधन घेणारे प्राण जेव्हा बॉबीसाठी 1 रुपया आकारतात, वाचा किस्सा…

'बरखुदार' हा शब्द ऐकताच अभिनेते प्राण (Pran) यांचा चेहरा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. प्राण आपली पत्नी आणि एक मुलगा अरविंद यांच्यासह पाकिस्तानातून भारतात आले होते.

अमिताभ बच्चनपेक्षाही अधिक मानधन घेणारे प्राण जेव्हा बॉबीसाठी 1 रुपया आकारतात, वाचा किस्सा...
प्राण
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 10:09 AM

मुंबई : ‘बरखुदार’ हा शब्द ऐकताच अभिनेते प्राण (Pran) यांचा चेहरा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. प्राण आपली पत्नी आणि एक मुलगा अरविंद यांच्यासह पाकिस्तानातून भारतात आले होते. अभिनेता ‘प्राण’ यांचे पूर्ण नाव प्राण किशन सिकंद आहे. त्यांना एक छायाचित्रकार व्हायचं होतं, पण नंतर त्यांनी अभिनयाच्या विश्वात पाऊल टाकलं आणि इथं त्यांनी आपल्या चमकदार अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावले. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर प्राण मुंबईत दाखल झाले होते.

फाळणीपूर्वी प्राण यांनी 22 चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केले होते. त्याचबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी 1942 साली ‘खानदान’ या चित्रपटाद्वारे काम सुरू केले. प्राणने त्यांच्या कारकिर्दीत अनेक नकारात्मक भूमिका केल्या असल्या, तरी चाहत्यांच्या मनात त्यांचा आदर एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही. प्राण यांचे काम प्रेक्षक आणि समीक्षकांनी इतके पसंत केले की, अभिनेते चित्रपटात खलनायक असले तरी निर्माते त्यांना नायकापेक्षा जास्त पैसे द्यायचे.

प्राण हे सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते होता. प्राणपेक्षा फक्त राजेश खन्ना अधिक शुल्क आकारत असत. 60 आणि 70च्या दशकात, दोघेही जास्त फी आकारत असल्याने निर्माते दोघांना एकत्र साईन करणे टाळत असत. एक काळ असा होता, जेव्हा ते अमिताभ बच्चनपेक्षा जास्त मानधन आकारत असत.

बिग बींपेक्षा अधिक मानधन

रिपोर्ट्सनुसार ‘बिग बीं’नी ‘डॉन’ या चित्रपटासाठी अडीच लाख रुपये मानधन घेतले होते, तर स्क्रीन कमी भूमिका असलेल्या प्राण यांनी 5 लाख रुपये घेतले होते. तथापि, प्राण पडद्यावर येताच ते प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची जादू अशा प्रकारे करत असत की, प्रत्येकजण त्यांच्या अभिनयात हरवून जात. हेच कारण आहे की, प्राण यांना निर्मात्यांनीही त्यांच्या अभिनयानुसार फी देण्यास मागेपुढे पाहिले नाही.

बॉबीसाठी आकाराला केवळ 1 रुपया

प्राण हे जरी बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते असले, तरी मनाने तो एक अतिशय चांगले व्यक्ती होता. प्राण यांनी राज कपूर यांच्या ‘बॉबी’ या चित्रपटासाठी फक्त 1 रुपये शुल्क आकारले होते. आता सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्याने हे का केले याबद्दल जाणून घेऊया.

प्राण यांना ‘बॉबी’ चित्रपटात साईन करावे अशी राज कपूर यांची इच्छा होती. परंतु, राज कपूर यांचा शेवटचा चित्रपट फ्लॉप ठरला होता,  ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. या चित्रपटात प्राणला साईन करायचे होते, पण त्यासाठी त्यांना जास्त पैसे देता आले नसते. प्राण यांना राज कपूर यांची अवस्था समजली आणि त्यांनी चित्रपटासाठी फी म्हणून केवळ 1 रुपया घेतला.

लूककडेही विशेष लक्ष

प्राण त्यांच्या अभिनयाप्रमाणेच, त्यांच्या लूकबद्दलही बरीच काळजी घेत असत. त्यांच्या घरी एक स्केच आर्टिस्ट देखील होता, जो त्यांच्या इच्छित लूकचे स्केच काढायचा. मग त्यांचा मेक-अप मॅन आणि विग मेकर त्यांच्या लूकवर काम सुरू करायचे. ‘गुमनाम’, ‘परवरीश’, ‘जंजीर’, ‘डॉन’ आणि ‘शहीद’ असे काही चित्रपट आहेत, ज्यात त्यांच्या पात्राचे कपडे आणि स्टायलिंगमुळे चाहतेही प्रभावित झाले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्राण यांना 3 वेळा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. 1997मध्ये त्यांना ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचवेळी प्राण यांना 2001मध्ये ‘पद्मभूषण’ आणि ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

(When Pran who earns more than Amitabh Bachchan charges Rs 1 for Bobby read the story)

हेही वाचा :

तैमूर इतकाच क्युट दिसतो ‘जेह’, करीनाच्या फॅनक्लबने शेअर केला छोट्या नवाबाचा पहिला फोटो!

Taapsee Pannu | ‘आऊटसायडर्स’साठी तापसी पन्नूचा खास प्लॅन, निर्माती बनून देणार नवी संधी!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.