पठाण चित्रपटासाठी चाहते घालत आहेत जीव धोक्यात? व्हिडीओ पाहून लोक हैराण, थेट थिएटरमध्ये घडला हा प्रकार
फक्त आणि फक्त शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट अपवाद ठरला आहे. बाॅक्स आॅफिसवरील अनेक रेकाॅर्ड हे पठाण चित्रपटाने आपल्या नावावर केले.
मुंबई : शाहरुख खान याचा पठाण चित्रपट (Movie) रिलीज झाल्यापासूनच मोठा धमाका करत आहे. पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झाला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर ओपनिंग डेलाच चित्रपटाने जबरदस्त कामगिरी करत जगभरातून तब्बल १०० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. पठाण हा शाहरुख खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे हे पुनरागमन नक्कीच दणदणीत ठरले आहे. शाहरुख खान याच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळते. गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूडचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते. मात्र, याला फक्त आणि फक्त शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट अपवाद ठरला आहे. बाॅक्स आॅफिसवरील अनेक रेकाॅर्ड हे पठाण चित्रपटाने आपल्या नावावर केले.
पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
And that craze Wait what ? it’s cracker’s #PathaanCollection #PathaanMovie #PathaanReview #ShahRukhKhan? #srk #pathaan pic.twitter.com/fFUycEQcKc
— Mubashshir Mk (@MoMubashshir001) January 29, 2023
देशामध्ये अनेक ठिकाणी पठाण चित्रपटाच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली. इतकेच नाहीतर पठाण चित्रपटामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या असल्याचे देखील सांगितले जात होते.
चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत होते. परंतू प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटाची प्रचंड क्रेझ बघायला मिळाली. अत्यंत महागडी तिकिटे खरेदी करूनही चाहते हा चित्रपट बघत आहेत.
विशेष म्हणजे चित्रपटाचा जलवा हा थिएटरमध्ये देखील बघायला मिळतोय. चाहते स्वत: चा जीव धोक्यामध्ये घालून थेट थिएटरमध्ये फटाके फोडताना दिसत आहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Mausam Badal Gaya ?. #ShahRukhKhan? With #PathaanMovie created history in India and also on overseas by breaking all previous records and that too on a Non Holiday! #BoxOffice #YRFSpyUniverse PATHAAN BREAKS ALL RECORDS pic.twitter.com/pUggKhPuL7
— Mr.Yash (@OneShot60118470) January 28, 2023
पठाण चित्रपटातील गाणे सुरू झाल्यानंतर थिएटरमध्ये चाहते पुढे स्क्रीन जवळ येऊन डान्स करताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर अनेक चाहते हे थिएटरमधील खुर्च्या देखील तोडत आहेत.
सोशल मीडियावर अनेक थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये चाहते हे थिएटरमध्ये धिंगाना घालत आहेत. यामुळे थिएटर मालकांचे मोठे नुकसान देखील होत आहे.