Alia Bhatt | रणबीरबरोबर लग्न कधी करणार? वाचा आलिया भट्टचं उत्तर!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही सुट्टीवर आणि पार्टीत एकत्र दिसतात.

Alia Bhatt | रणबीरबरोबर लग्न कधी करणार? वाचा आलिया भट्टचं उत्तर!
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 6:43 PM

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही सुट्टीवर आणि पार्टीत एकत्र दिसतात.  काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या देखील येत आहेत. मात्र, अद्याप दोघेही लग्नासाठी तयार नाहीत.  आलिया लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला, तेव्हा ती म्हणाला की, अद्याप आम्ही दोघानीही लग्नाचा कोणताही विचार केला नाही आणि सारखा सारखा तोच लग्नाबद्दलचा प्रश्न का विचारतात. (When will Alia Bhatt and Ranbir Kapoor get married?)

पिंकविलाबरोबर बोलताना आलिया म्हणाली, ‘मी लग्न कधी करणार? प्रत्येकजण मला हे प्रश्न का विचारत आहे? तुम्हा माहिती आहे की मी 25 वर्षांची आहे आणि आताच  लग्न करणे खूप लवकर होईल. आलिया पुढे म्हणाली की, योग्य वयातच मी लग्न करेल.

एका मुलाखतीत आलियाने रणबीरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले होते की, ‘हे एक फक्त नातं नाही तर खूप चांगली मैत्री आहे. आलिया आणि रणवीर दोघेही ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातसोबत दिसणार आहेत. या चित्रपटात आलिया, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे रणबीर आणि आलिया पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. याशिवाय आलिया ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातही दिसणार आहे, संजय लीला भन्साळी हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते. नुकत्याच एका मुलाखतीत ‘स्टार’ आणि ‘डिज्नी इंडिया’ चे अध्यक्ष उदय शंकर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तविली आहे. ‘एचटी लीडरशिप समिट 2020’मध्ये बोलताना शंकर म्हणाले की, “ब्रह्मास्त्र” हा आतापर्यंत बनलेला भारतातील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. पण याबद्दल बोलताना उदय यांनी चित्रपटाचे बजेट जाहीर केले नाही.

जेव्हा उदय शंकर यांना, ‘ब्रह्मास्त्र चित्रपटाची एकूण किंमत 300 कोटी आहे का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, त्यापेक्षाही जास्त आहे. असा कोणताही चित्रपट करण्यास वेळ लागतो.  आणि अशा चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. या चित्रपटामध्ये खूपसे ग्राफिक्स वापरले आहे. करण जोहर हा चित्रपट ओटीटी रिलीजवर करण्याबाबत उत्सुक नसल्याचे म्हटले जात होते.

संबंधित बातम्या : 

मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा, सरकारला खूश करण्याचा प्लॅन ?

Covid-19 | अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करत केले आवाहन!

(When will Alia Bhatt and Ranbir Kapoor get married?)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.