ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, चाहत्यांना बसला धक्का
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे प्रचंड चर्चेत आहेत. हेच नाही तर सतत यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. यामध्ये काही मोठे खुलासे होताना देखील दिसत आहेत. त्यामध्येच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. यांच्या घटस्फोटाची सतत चर्चा होताना दिसत आहे. इतकेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगितले जात आहे. मुलगी आराध्या आणि ऐश्वर्या राय सध्या तिच्या आईच्या घरी राहत असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये इतका दुरावा नेमक्या कोणत्या कारणामुळे आला, याबद्दल चर्चा होत आहे. मात्र, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाल्यापासून चाहते चिंतेमध्ये आले आहेत.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच यावर बच्चन कुटुंबियांकडून अजिबातच काही भाष्य हे करण्यात नाही आले. इतकेच नाही तर नुकताच हे एका कार्यक्रमात पोहचले त्यावेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये पोहचल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या.
हेच नाही तर अभिषेक बच्चन याला पाहून त्याच्या जवळ जाताना ऐश्वर्या राय दिसली. मात्र, अभिषेक हा ऐश्वर्या रायला पाहून निघून जाताना दिसला. यावेळी ऐश्वर्या राय हिचा चेहरा बरेच काही बोलून गेला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन याच्यासारखा व्यक्ती दिसत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्ये तो व्हिडीओ (रिल्स) व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर युजर्स हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, भाई सलमान खान आणि अभिषेक बच्चन तुम्हीच एकटे आहात. या व्हिडीओला आतापर्यंत 7 मिलियन लोकांनी बघितले आहे. 82.7 लोकांनी या व्हिडीओ लाईक केले आहे. 34.4 लोकांनी या व्हिडीओला शेअर केले आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये हे गळा भेट घेताना दिसले होते.