मॉडेल्स सप्लायचं हायफाय सेक्स रॅकेट, एका मॉडेल्ससाठी घ्यायची इतकी रक्कम; कोण आहे Aarti Mittal?

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरती मित्तलला पोलिसांनी अटक केली आहे. मॉडेल्सची सप्लाय करण्याचं काम आरती मित्तल करत होती. त्यासाठी ती मोठी रक्कम वसूल करत होती. याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी तिची थेट तुरुंगात रवनागी केली आहे.

मॉडेल्स सप्लायचं हायफाय सेक्स रॅकेट, एका मॉडेल्ससाठी घ्यायची इतकी रक्कम; कोण आहे Aarti Mittal?
aarti mittalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 6:34 AM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री आरती मित्तल हिला मुंबई पोलिसांनी सेक्स रॅकेट प्रकरणात अटक केली आहे. सेक्स रॅकेट चालवताना पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं आहे. आरती हॉटेल्समध्ये तरुणींना सप्लाय करण्याचं काम करायची. त्यात मॉडेल्सचा भरणा अधिक असायचा. एका मुलीमागे ती 30 ते 40 हजार रुपये घ्यायची. त्यातील अर्धे पैसे म्हणजे 15 हजार रुपये ती त्या मुलींना द्यायची. याची कुणकुण लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरतीला पकडलं आहे. त्यामुळे मुंबईतील एका हायफाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

आरती मित्तल ही गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये मुली पाठवायची. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आपल्याच लोकांना कस्टमर बनून त्या हॉटेलमध्ये पाठवले. या लोकांनी आरतीशी संपर्क साधला. यावेळी तिने दोन तरुणींसाठी 60 हजार रुपये मागितले. एवढेच नव्हे तर आरतीने या लोकांना देहविक्रीच्या धंद्यात येण्याची ऑफर दिली. एवढेच नव्हे तर या धंद्यात आल्यास मोठी रक्कम देऊ असं अमिषही दाखवलं.

हे सुद्धा वाचा

कोण आहे आरती मित्तल

आरती मित्तल ही टीव्ही अभिनेत्री आहे. अभिनया व्यतिरिक्त ती कास्टिंग डायरेक्टरही आहे. अपनापन, बदलते रिश्ते आदी टीव्ही सीरियलमध्ये तिने काम केलं आहे. या शिवाय तिने ना उम्र की सीमा हो या सीरियलमध्येही काम केलं आहे. या सीरियलमध्ये तिने नलिनी गायकवाड ही व्यक्तीरेखा साकारली होती. तिने जी-5च्या एक्सप्लोसिव्ह या वेब सीरिजमध्ये वैभवी शर्माची भूमिका साकारली होती. दिवगंत दिग्दर्शक सतिश कौशिक यांच्या 2022मध्ये आलेल्या कर्म युद्ध या वेब सीरिजमध्येही तिने काम केलं होतं. या वेब सीरिजमध्ये अभिनेता आशुतोष राणाही होते. ये चाहते है, सनक : एक जुनून आदी शोमध्येही तिने काम केलं होतं.

सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स

आरती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे व्हिडीओ, रिल्स आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आरतीचे इन्स्टाग्रामवर 103k फॉलोअर्स आहेत. तिच्या इन्स्टावर तिने अनेक अभिनेत्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या शिवाय स्वत:चे अनेक ग्लॅमरस फोटोही तिने शेअर केले आहेत.

बॉलिवूडमध्ये चमकणार होती

30 वर्षाची आरती ही मुंबईत राहते. ती ओशिवराच्या एका अपार्टमेंटमध्ये राहते. trade marked plantastic filmsची सर्वेसर्वा असल्याचं तिने आपल्या सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलं आहे. ही एक कास्टिंग कंपनी आहे. लवकरच ती बॉलिवूड अभिनेता आर. माधवनच्या सिनेमात दिसणार होती. या सिनेमाची शुटिंग सुरू होणार होती, तिनेच सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये लिहिलं होतं. तिच्या लेटेस्ट पोस्टमध्ये ती रेशम ज्वेलसला प्रमोट करताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.