‘इस्लाम विसरलास का?’, गणपती विसर्जन पोस्ट शेअर केल्यानंतर शाहरुख खान सोशल मीडियावर ट्रोल!
विसर्जनाच्या दिवशी शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर गणपती बाप्पाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये गणपतीची मूर्ती दिसत आहे. पण, हा सुंदर फोटो शेअर केल्यानंतरही शाहरुख ट्रोल्सच्या निशाण्यावर आला आहे.

मुंबई : बॉलिवूडमध्ये दरवर्षी गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. दरवर्षी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात. या दरम्यान, शाहरुख असो किंवा सलमान, ते गणपती बाप्पाचे स्वागत धुमधडाक्यात करतात. एवढेच नाही तर, बॉलिवूड स्टार्सही गणपती बाप्पाला निरोप देतानाचा क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने त्याच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली होती.
तर, विसर्जनाच्या दिवशी शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर गणपती बाप्पाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये गणपतीची मूर्ती दिसत आहे. पण, हा सुंदर फोटो शेअर केल्यानंतरही शाहरुख ट्रोल्सच्या निशाण्यावर आला आहे. खरं तर, कट्टरपंथीय लोक त्याला गणपतीच्या पूजेनंतर त्याच्या धर्माची आठवण करून देत आहेत. यासंदर्भात बॉलिवूड किंग शाहरुख खानवर ट्रोलर्स प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत.
सोशल मीडियावर शेअर केला फोटो
शाहरुख अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये त्याच्या आयुष्याशी आणि चित्रपटांशी संबंधित गोष्टी शेअर करतो. तो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सक्रिय राहतो. लाखो चाहत्यांशी कायम संपर्कात राहण्यासाठी तो सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी शेअर करत राहतो. म्हणूनच त्याने आपल्या घरात बसलेल्या गणपती बाप्पाचा फोटो शेअर करत एक कॅप्शन लिहिले आहे. त्याने आपल्या चाहत्यांना गणपतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा पोस्ट :
View this post on Instagram
शाहरुख खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर गणपती विसर्जनाची एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात शाहरुखने त्याच्या चाहत्यांना गणपती विसर्जनाच्या निमित्ताने संदेश दिला आहे. शाहरुखने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ‘पुढील वर्षापर्यंत गणपतीचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर असू दे… गणपती बाप्पा मोरया!!’
ट्रोलर्सच्या निशाण्यावर किंग खान
शाहरुख खानची ही पोस्ट पाहिल्यानंतर ‘धर्म विसरलास का?’, असं म्हणत ट्रोलर्सनी त्याच्यावर हल्लाबोल केला आहे. तो कोणत्या धर्माचा आहे, हे एका युजरने त्याला आठवण करून देत कमेंट केली आहे. तर एकाने लिहिले की, ‘तुम्ही तुमचा धर्म विसरलात का?’ त्याचवेळी, ट्रोलर्सने असेही लिहिले, ‘तुम्ही आधीच तुमचा धर्म बदलला आहे वाटतं’, तर एका वापरकर्त्याने लिहिले, ‘तुम्ही त्या लोकांना खूश करण्यासाठी तुमच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि तुम्ही मुस्लिम कुटुंबातील आहात हे विसरला आहात..’
दुसरीकडे, शाहरुखचे चाहते त्याच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. शाहरुखचा बचाव करताना ते सोशल मीडियावर एकमेकांशी वाद घालताना दिसतात.
हेही वाचा :
Bigg Boss OTT | पती आणि कुटुंबाबद्दल नकारात्मक कमेंट्स, ‘बिग बॉस ओटीटी’ फेम नेहा भसीन म्हणते…